IND vs SA 2nd Test: टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा विजयासह संपुष्टात आला आहे. दोन्ही संघांमधील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना अतिशय रोमांचक झाला आणि दोन दिवसांतच निकाल भारतीय संघाच्या बाजूने (IND Beat SA) लागला. केपटाऊनच्या (Cape Town) न्यूलँड्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने (Team India) विजय मिळवला. या विजयासह रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाचा केपटाऊनमधील 31 वर्षांचा दुष्काळ संपला. केपटाऊनमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड खूपच खराब होता. या मैदानावर टीम इंडियाने 6 कसोटी सामने खेळले. यापैकी भारतीय संघाला 4 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. त्याच वेळी, 2 सामने अनिर्णित राहिले. म्हणजेच 1993 ते 2022 या दौऱ्यात टीम इंडियाने येथे एकही कसोटी सामना जिंकलेला नव्हता. पण यावेळी टीम इंडियाने केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेला हरवून 31 वर्षांचा दुष्काळ संपवला.
न्यूलँड्स स्टेडियमवर टीम इंडियाची कामगिरी
जानेवारी 1993- सामना अनिर्णित राहिला
जानेवारी 1997- दक्षिण आफ्रिकेचा 282 धावांनी विजय
जानेवारी 2007- दक्षिण आफ्रिका 5 विकेटने जिंकली
जानेवारी 2011- सामना अनिर्णित राहिला
जानेवारी 2018- दक्षिण आफ्रिका 72 धावांनी विजयी
जानेवारी 2022- दक्षिण आफ्रिका 7 गडी राखून जिंकली
जानेवारी 2024- भारताने 7 विकेटने सामना जिंकला
केपटाऊन कसोटी सामन्याचा लेखाजोखा
केपटाऊन कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 55 धावांत गुंडाळले होते. पण प्रत्युत्तरात टीम इंडिया फार काही करू शकली नाही आणि 153 धावांवर ऑलआऊट झाली. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दुसऱ्या डावात 176 धावा केल्या आणि भारताला विजयासाठी 79 धावांचे लक्ष्य दिले. भारताने हे लक्ष्य 3 गडी गमावून पूर्ण केले. (हे देखील वाचा: Team India New Record: टीम इंडियाने बनवला अनोखा विक्रम, इतिहासातील सर्वात लहान कसोटी सामना जिंकला)
पहिल्या कसोटीत दारुण पराभव पत्करावा लागला होता
भारताविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला होता. या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून एक डाव आणि 32 धावांनी पराभव झाला. पण टीम इंडियाने शानदार पुनरागमन करत केपटाऊन कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवली. मात्र, यावेळीही दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले.