South Africa National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 2nd Test 2025: दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान (SA vs PAK) यांच्यातील दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना केपटाऊनमधील (Capetown) न्यूलँड्स येथे खेळवला जाणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका 1-0 ने आघाडीवर आहे. आता दुसरा सामना जिंकून मालिका काबीज करण्यावर दक्षिण आफ्रिकेच्या नजरा असतील. दुसरीकडे पाकिस्तान संघाला दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात बदल करण्यात आले आहेत. पाकिस्तानने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला असून, नसीम शाहच्या जागी मीर हमजाचा समावेश करण्यात आला आहे. टोनी डी झॉर्झी दुखापतीमुळे बाहेर असून त्याच्या जागी विआन मुल्डरचा समावेश करण्यात आला आहे.
दोन्ही संघांची पाहा प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ: एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, विआन मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेने (विकेटकीपर), मार्को जॉन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, क्वेना म्फाका.
पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ: शान मसूद (कर्णधार), सैम अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान आगा, आमेर जमाल, मीर हमजा, खुर्रम शहजाद, मोहम्मद अब्बास
South Africa have secured a spot in the WTC final... can they take the series 2-0?
They've opted to bat at Newlands https://t.co/xugBY0EnIP #SAvPAK pic.twitter.com/F95q7CYEnI
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 3, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)