Zika Virus Advisory: महाराष्ट्रामध्ये झिका व्हायरसची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. काल पुण्यात या व्हायरसने संक्रमित असा 7 वा रुग्ण आढळला. महाराष्ट्रातील झिका विषाणूची नोंदवलेली प्रकरणे पाहता, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक अॅडव्हायजरी जारी केली आहे, ज्यामध्ये देशातील झिका विषाणूच्या परिस्थितीवर सतत दक्ष राहण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे. राज्यांना बाधित भागातील आरोग्य सुविधांना सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यांना आरोग्य सुविधा/रुग्णालयांना नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्याचा सल्ला देण्याचे निर्देश देण्यात आले असून, ते परिसर एडिस डासमुक्त ठेवण्यासाठी देखरेख ठेवण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी कार्य करतील. कोणत्याही आढळलेल्या प्रकरणाची त्वरित एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP) आणि नॅशनल सेंटर फॉर वेक्टर बोर्न डिसीजेस कंट्रोल (NCVBDC) कडे तक्रार करण्याचे आवाहनही राज्यांना करण्यात आले.
झिका हा डेंग्यू आणि चिकुनगुनिया सारखा एडिस डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हा एक घातक नसलेला आजार आहे. मात्र, हा आजार बाधित गर्भवती महिलांमध्ये जन्मलेल्या बाळांच्या मायक्रोसेफली (डोक्याचा आकार कमी) शी संबंधित आहे ज्यामुळे ही एक प्रमुख चिंता आहे. भारतामध्ये 2016 मध्ये गुजरात राज्यातून प्रथम झिका प्रकरणाची नोंद झाली. तेव्हापासून, तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि कर्नाटक या इतर अनेक राज्यांमध्ये नंतर प्रकरणे नोंदवली गेली. (हेही वाचा: Pune Zika Virus: पुण्यात झिका विषाणूच्या संसर्गाचा प्रसार वाढला; एकूण रुग्णांची संख्या सातवर)
पहा पोस्ट-
Union Health Ministry issues advisory to states in view of Zika virus cases from Maharashtra. States urged to maintain a state of constant vigil through screening of pregnant women for Zika virus infection and monitoring the growth of foetus of expecting mothers who tested… pic.twitter.com/lHFZkDfn5i
— ANI (@ANI) July 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)