Pune Zika Virus: महाराष्ट्रातील पुण्यात झिका विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. याआधी 21 जून रोजी पुण्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर आता 11 दिवसांत रुग्णांची संख्या 7 झाली आहे. आज एका 55 वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. त्यामुळे शहरातील या जीवघेण्या विषाणूच्या रुग्णांची संख्या सात झाली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. पुणे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ताजे प्रकरण कोथरूडच्या डहाणूकर कॉलनीतील असून, पीडित महिलेने अंगावर पुरळ आणि सांधे दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आलेल्या अहवालात तिला झिका व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली. महिलेची प्रकृती ठीक असून तिला सध्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. झिका विषाणूचा संसर्ग संक्रमित एडिस डासाच्या चाव्याव्दारे पसरतो. डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रसार होण्यासही हा डास कारणीभूत आहे. (हेही वाचा: Deaths Due To Alcohol and Drug Use: दारू आणि अंमली पदार्थांच्या सेवनामुळे दरवर्षी 30 लाखांहून अधिक मृत्यू, बहुसंख्य पुरुष; WHO च्या अहवालात धक्कादायक खुलासा)
पहा पोस्ट-
#WATCH | Pune, Maharashtra: Pune Municipal Corporation Health Officer, Kalpana Baliwant says, "Seventh positive case of Zika virus has been reported in Pune...We are controlling the vector responsible for the disease...Container surveys are being done in the vicinity of the… pic.twitter.com/5tRM75NdLP
— ANI (@ANI) July 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)