Human Milk: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने (FSSAI) मानवी दुधाबाबत एक महत्वपूर्ण आदेश जारी केला आहे. प्राधिकरणने एफएसएस कायदा (FSS Act) 2006 अंतर्गत मानवी दुधावर प्रक्रिया करणे किंवा त्याची विक्री करण्यास परवानगी नाकारली आहे. मानवी दूध आणि त्याच्या उत्पादनांच्या व्यापारीकरणाशी संबंधित सर्व क्रियाकलाप थांबवण्याचा सल्ला प्राधिकरणने दिला आहे. यासह राज्य परवाना प्राधिकरणांना मानवी दुधाचा व्यवसाय करण्याचा परवाना देण्यापासून परावृत्त करण्याचे निर्देश दिले आहेत. प्राधिकरणने चेतावणी दिली आहे की, या आदेशाचे उल्लंघन झाल्यास, अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, 2006 आणि त्याच्याशी संबंधित नियमांनुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते.

सार्वजनिक आरोग्य सुविधांमधील स्तनपान व्यवस्थापन केंद्राच्या (LMC) राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दात्याचे मानवी दूध कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी वापरले जाऊ शकत नाही. सर्व विहित प्रक्रियांचे पालन करून हे दुध सर्वसमावेशक स्तनपान व्यवस्थापन केंद्रांसह सुसज्ज आरोग्य सुविधांमध्ये फक्त नवजात किंवा अर्भकांनाच प्रदान केले जावे. गेल्या दशकभरात, अनेक कंपन्या उदयास आल्या आहेत, ज्या मार्केटिंग आणि विक्रीच्या उद्देशाने मानवी दुधावर पावडर स्वरूपात प्रक्रिया करतात, अशा कंपन्यांचा या कृत्यांवर चाप बसवण्यासाठी प्राधिकरणने हा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: Life Expectancy Dropped By 2 Years: कोविड-19 मुळे लोकांचे सरासरी वय जवळपास 2 वर्षांनी कमी झाले; WHO च्या अहवालात धक्कादायक खुलासा)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)