Mother Dairy Hikes Milk Prices: मदर डेअरीने दुधाच्या किमतीत केली प्रति लिटर 2 रुपयांची वाढ; जाणून घ्या नवीन दर
मदर डेअरीने दुग्ध उत्पादकांकडून कच्च्या दुधाच्या खरेदी खर्चात वाढ झाल्यामुळे दरवाढ झाल्याचे सांगितले. गेल्या काही महिन्यांत दूध खरेदी करण्यासाठी जास्त किंमत देऊनही, आम्ही किमती वाढवल्या नाहीत, असे मदर डेअरीने म्हटले आहे.
मदर डेअरीने दुधाच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीने 29 एप्रिलपासून दुधाच्या किमतीत 2 रुपयांची वाढ केली आहे. वाढलेल्या किमती बुधवार, 30 एप्रिलपासून लागू होतील. दिल्ली-एनसीआरमध्ये टोन्ड दुधाची (बल्क व्हेंड) किंमत 54 रुपयांवरून 56 रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे. फुल क्रीम दुधाची (पाउच) किंमत प्रति लिटर 68 रुपयांवरून 69 रुपये करण्यात येईल. टोन्ड दुधाची (पाउच) किंमत प्रति लिटर 56 रुपयांवरून 57 रुपये करण्यात आली आहे, तर डबल टोन्ड दुधाची किंमत प्रति लिटर 49 रुपयांवरून 51 रुपये करण्यात आली आहे. गायीच्या दुधाची किंमत 57 रुपये प्रति लिटरवरून 59 रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे. मदर डेअरीने दुग्ध उत्पादकांकडून कच्च्या दुधाच्या खरेदी खर्चात वाढ झाल्यामुळे दरवाढ झाल्याचे सांगितले. गेल्या काही महिन्यांत दूध खरेदी करण्यासाठी जास्त किंमत देऊनही, आम्ही किमती वाढवल्या नाहीत, असे मदर डेअरीने म्हटले आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची उपकंपनी असलेली मदर डेअरी 12 राज्यांमधील 10 लाख शेतकऱ्यांकडून दूध मिळवते आणि भारतभरातील 4 लाख किरकोळ दुकानांमधून त्याची विक्री करते. (हेही वाचा: Residential Home Prices: देशात आर्थिक वर्ष 2026 मध्ये घरांच्या किमती 3 ते 4 टक्के वाढण्याची शक्यता- India Ratings Report)
Mother Dairy Hikes Milk Prices:
Mother Dairy hikes milk prices by up to Rs 2 per litre effective Wednesday
— Press Trust of India (@PTI_News) April 29, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 29, 2025 10:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

