Milk Adulteration: राज्यात काही ठिकाणी दुधात भेसळीचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाकडून काल एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहीम राबविण्यात येऊन, १,०६२ दुधाचे सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले. या तपासणी नमुन्यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. अन्न व औषध प्रशासन विभाग अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ ची अंमलबजावणी करुन, राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करुन त्यांचे जीवनमान उंचावण्याबाबत विविध उपाययोजना करीत असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.
या मोहिमेअंतर्गत एकाचवेळी राज्यभरातील विविध ठिकाणांहून दूधाचे सर्वेक्षण नमुने घेऊन त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी १०३ अन्न सुरक्षा अधिकारी यांना सर्वेक्षण नमुने घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. या नमुन्यामध्ये भेसळ आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी दूध किंवा अन्नपदार्थांमध्ये भेसळ दिसल्यास खालील ठिकाणी तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा: Edible Oil Adulteration: खाद्यतेलातील भेसळ कशी ओळखावी? FSSAI ने सांगितली घरगुती युक्ती)
अन्न व औषध प्रशासनाच्या हेल्पलाइन क्रमांक- १८००२२२३६५
ईमेल- jc-foodhq@gov.in
पोर्टल- https://foscos.fssai.gov.in/consumergrievance
अन्न व औषध प्रशासन विभागाने दूध भेसळ तपासणी मोहीमेअंतर्गत दुधाचे १ हजार ६२ सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले. यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना मंत्री @Narhari_Zirwal यांनी दिल्या. भेसळीबाबत १८००२२२३६५ या हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 15, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)