भेसळ (Adulteration) हा शब्द आणि प्रकार आजकाल कोणालाच नवा अथवा अपरिचित राहिला नाही. मग ती औषधांमधील असो, वस्तू, पदार्थ अथवा इतर कशातील. त्यामुळे वाढती भेसळ रोखण्याचे मोठेच आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकते. आता तर खाद्यतेल भेसळ (Edible oil Adulterations) हे आव्हान आणखी गडद होऊन घराघरात पोहोचले आहे. तुमच्या स्वयंपाकात वापरले जाणारे खाद्यतेल भेसळयुक्त असू शकते. तुम्ही वापरत असलेले खाद्यतेल (Cooking Oil) भेसळयुक्त आहे किंवा नाही हे तुम्ही अवघ्या दोन मिनिटांत तपासू शकता. तेही घरच्या घरी. फूड सेफ्टी एंड स्टैंडर्ड्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ही खाद्यतेल भेसळ ओळखण्याची क्लृप्ती सांगितली आहे.
'एफएसएसएआय'ने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत खाद्यतेल गुणवत्ता तपासण्याची एक खास पद्धत आणि प्रक्रिया सांगितली आहे. ज्यामुळे अवघ्या दोन मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील खाद्यतेल गुणवत्तापूर्ण आहे की त्यात भेसळ आहे हे तपासू शकता. तसेच, भेसळयुक्त तेलापासून स्वत:चा बचाव करु शकता. (हेही वाचा, स्वयंपाकासाठी वापरला जाणारा मसाला भेसळयुक्त आहे की नाही 'या' पद्धतीने तपासून पहा)
कशी ओळखाल खाद्य तेलातील भेसळ?
खाद्य तेलात जर मेटनिल यलो (पिवळ्या) रंगाचा वापर झाला असेल तर आपण त्याला थेट तपासू शकता. FSSAI ने दिलेल्या माहितीनुसार, एका टेस्ट ट्युबमध्ये साधारण 1ml तेल घ्या आणि त्या जवळपास 4ml घालून ते छान मिश्रण करा. आता दुसरी एक टेस्ट ट्यूब घ्या. त्यात आगोदरच्या ट्युबमधील (पाणी आणि तेल) 2ml मिश्रण दुसऱ्या ट्युबमध्ये घ्या. त्यात 2ml कॉन्सेंट्रेटिड हाइड्रोक्लोरिक एसिड (Concentrated Hydrochloric Acid) टाका.
ट्विट व्हिडिओ-1
Detecting prohibited colour like metanil yellow Adulteration in Oil#DetectingFoodAdulterants_5#AzadiKaAmritMahotsav@jagograhakjago @mygovindia @MIB_India @PIB_India @MoHFW_INDIA pic.twitter.com/hFYqIwLHJ7
— FSSAI (@fssaiindia) September 8, 2021
आपले खाद्यतेल जर शुद्ध असेल तर त्या तेलाचा वरच्या थराचा रंग अजिबात बदलणार नाही. जर ते तेल भेसळयुक्त असेल तर त्याचा रंग नक्कीच बदललेला असेल. अशा पद्धतीने आपण आपल्या तेलातील भेसळ शोधू शकता. FSSAI ने TOCP च्या मदतीने खाद्यतेलातील भेसळ शोधण्याची युक्ती, तंत्र्य सांगितले आहे. तेलात केमिकल कंम्पाउंडचा वापर झाला आहे किंवा नाही हे समजण्यासाठी या अत्यंत साध्या सोप्या आणि घरगुती चाचण्या करता येऊ शकतील.
ट्विट व्हिडिओ-2
Detecting Tri-ortho-cresyl-phosphate Adulteration in Oil.#DetectingFoodAdulterants_6#AzadiKaAmritMahotsav@jagograhakjago @mygovindia @MIB_India @PIB_India @MoHFW_INDIA pic.twitter.com/YLRp7NzfEa
— FSSAI (@fssaiindia) September 15, 2021
खाद्यतेलातील भेसळ शोधण्यासाठी आपण आणखीही दुसरा प्रयोग करु शकता. दोन वेगवेगळ्या ग्लासमध्ये साधारण 2ml तेल घ्या. त्या ग्लासमध्ये लोण्याचा एक छोटासा तुकडा टाका. तुमचे तेल जर शुद्ध असेल तर तुमच्या तेलात लोणी टाकूणही तेलाचा रंग बदलणार नाही. पण जर त्यात भेसळ असेल तर तेलाचा रंग (वरचा थर) बदलेल किंवा ते लाल होईल. बाजारातून कोणत्याही कंपनीचे खाद्यतेल आणले तर आपण त्याची गुणवत्ता तपासलीच पाहिजे, असे FSSAI सांगते.