देश सध्या दुध, चिकन आणि अंड्यावर चालत असल्याचे दिसून येत आहे. देशामध्ये या पदार्थांचा वापर वाढला आहे. ज्यामुळे भाज्या कदाचित आपल्या ताटातून कमी होत आहेत की काय अशी भीती निर्माण झाली आहे. सरकारच्या नवीनतम सर्वेक्षणातून भारतीयांच्या खाण्याच्या सवयी, पद्धती कशा बदलत आहेत हे दिसून येते. भारतातील सरासरी व्यक्ती इतर कोणत्याही अन्नापेक्षा दुधावर जास्त खर्च करते. शहरी भारतात दरमहा प्रति व्यक्ती 500 रुपये आणि ग्रामीण भारतात जवळपास 350 रुपये दुधावर खर्च होत आहेत. भाजीपाल्याला शहरी भागात अन्न बजेटमध्ये फक्त 290 रुपये मिळतात आणि ग्रामीण भागात त्याहूनही कमी 250 रुपये. सरकारच्या नवीनतम उपभोग खर्च सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, भारतातील शहरांमध्ये मांसावर 250 रुपये खर्च होतात खेड्यांमध्ये 200 रुपये खर्च केले जातात. यावरून दिसून आले आहे की, भारतीय दुधावर खूप पैसे खर्च करतात, मात्र भाज्या खात नाहीत. (हेही वाचा: Indians' Food Habits: 'वाईट अन्न' हे भारतातील 56% आजारांचे कारण; खाऊ नयेत अशा पदार्थांचे सेवन करत आहेत देशातील लोक, AIIMS ने व्यक्त केली चिंता)
What Indians Are Eating:
The country runs on milk, chicken and egg consumption have gone up, and vegetables might be falling off our plate — the government’s latest consumption survey shows how Indian food is changing.https://t.co/XbrxyAILbp pic.twitter.com/vGdtSr72Qn
— TOI Plus (@TOIPlus) February 13, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)