UAE  Flash Floods Viral Video | (Photo Credit - Twitter)

संयुक्त अरब अमीरात, यूएई (UAE) मध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rains) महापूर (Flood) आला आहे. सोशल मीडियावर या महापूराचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये लाखो रुपये किमतीची वाहने पाण्यात वाहून गेली आहेत. ज्यामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे. महापूर आलेल्या अनेक ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. प्रामुख्याने ही घटना शारजाह (Sharjah) आणि फुजेरिया (Fujairah) परिसरात मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. ही दोन्ही शहरं महापूराने मोठ्या प्रमाणावर वेढली आहेत. फुजेरिया या शहराला पावसाचा आणि पुराचा फटका अधिक बसला आहे. कारण हे शहर डोंगररांगामध्ये वसलेले आहे.

दुबई (Dubai) आणि आबूधाबी (Abu Dhabi) मध्ये राहणाऱ्या लोकांना सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. कारण या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने महापूर आला आहे. ट्विटरवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, फुजेरियामधील रस्त्यांवर पाणीच पाणी आहे. रस्त्यांवर उभी असलेली वाहने मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेली आहेत. हे पाणी रस्त्यांवरुन आता बाजारपेठांमध्येही घुसले आहे. (हेही वाचा, Goa:चेन्नई एक्सप्रेस फेम Dudhsagar धबधब्याचे सौंदर्य पाहून पडाल प्रेमात, पाहा व्हिडीओ)

ट्विट

एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळते आहे की, शहरांतील नागरी वसाहतीतील एक मोठा भाग पूरामुळे पाण्याखाली गेला आहे. रस्ते उखडले गेले आहेत. झाडेही उन्मळून गेली आहेत. खलीज टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार यूएई पूर्व परिसरात अचानक मुसळदार पाऊस पडला. त्यामुळे नागरी भागांमध्ये पाणी शिरले. वाहनांचे आणि जिवनावश्यक वस्तूंचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अमीरातच्या हवामान विभागाने आगोदरच मुसळधार पावसाचा इशारा दिला होता.

ट्विट

ट्विट

द नॅशनलने म्हटले आहे की, आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी 900 नागरिकांचा बचाव केला आहे. तसेच, 3,897 नागरिकांना शाहजाह आणि फुजेरिया येथे अनिश्चित काळासाठी स्थलांतरीत करण्यात आले आहे.