Birth | Representative Image | (Photo Credits: Pixabay)

आज संपूर्ण जग विज्ञानाचे विविध चमत्कार पाहत आहे. चंद्र-मंगळावरील प्रवास, विविध आजारांवर केलेली मात, 6जी तंत्रज्ञान अशा विविध प्रकारे आपण हे चमत्कार पाहत आहोत. आता वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीचे एक आश्चर्यकारक उदाहरण समोर आले आहे. वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीमुळे इंग्लंडमधील पहिल्या सुपरकिडचा (Super Kid) जन्म झाला आहे. म्हणजेच तीन लोकांच्या डीएनएद्वारे (Three-Parent Baby) या बाळाचा जन्म झाला आहे.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, या विशेष बालकाला कोणताही अनुवांशिक रोग किंवा असे कोणतेही हानिकारक जनुकीय उत्परिवर्तन-म्यूटेशन होणार नाही, ज्यावर उपचार करता येणार नाहीत. कारण हे बाळ तीन लोकांच्या डीएनएचे मिश्रण करून तयार करण्यात आले आहे.

या मुलाचा जन्म इंग्लंडमध्ये झाला आहे. या मुलामध्ये पालकांच्या डीएनएशिवाय तिसऱ्या व्यक्तीचा डीएनएही यात समाविष्ट आहे. डीएनएची खासियत जपण्यासाठी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. माइटोकॉन्ड्रियल डोनेशन ट्रीटमेंट (MDT) तंत्राने या बालकाची निर्मिती करण्यात आली आहे.

शास्त्रज्ञांनी निरोगी महिलेच्या अंड्यांमधून टिश्यू घेऊन आयव्हीएफ भ्रूण तयार केले. या गर्भामध्ये, जैविक पालकांचे शुक्राणू आणि अंड्यांचे माइटोकॉन्ड्रिया (पेशीचे पॉवर हाउस) एकत्र मिसळले गेले. पालकांच्या डीएनए व्यतिरिक्त, तिसऱ्या निरोगी महिला दात्याच्या जनेटिक मटेरिअलमधून मुलाच्या शरीरात 37 जीन्स समाविष्ट केले होते. म्हणजेच हे बाळ तीन पालकांचे आहे. परंतु यातील 99.8 टक्के डीएनए केवळ त्याच्या खऱ्या पालकांचे आहेत.

एमडीटीला (MDT) ला एमआरटी (MRT) म्हणजेच Mitochondrial Replacement Treatment असेही म्हणतात. ही पद्धत इंग्लंडच्या डॉक्टरांनी विकसित केली आहे. या मुलाचा जन्म इंग्लंडमधील न्यूकॅसल फर्टिलिटी सेंटरमध्ये झाला आहे. जगातील प्रत्येक 6 हजारांपैकी सुमारे एक मूल माइटोकॉन्ड्रियल आजारांनी ग्रस्त आहे, म्हणजे या बाळांना गंभीर आनुवंशिक रोग आहेत. त्यामुळे पालकांचे अनुवांशिक आजार मुलाकडे जाऊ नयेत हाच हे सुपरबेबी बनवण्यामागचा शास्त्रीय हेतू होता. (हेही वाचा: Prime Energy Drink सेवन केल्याने हृदयविकाराचा झटका? शालेय विद्यार्थ्यांना न पिण्याचा सल्ला)

जाणून घ्या काय आहे MDT प्रक्रिया-

सर्वप्रथम, वडिलांच्या शुक्राणूंच्या मदतीने आईची अंडी फलित केली जातात. त्यानंतर दुसर्‍या निरोगी स्त्रीच्या अंड्यांमधून न्यूक्लिअर जनेटिक मटेरिअल काढले जाते आणि ते पालकांच्या फलित अंड्यांमध्ये मिसळले जाते. यानंतर, या अंड्यावर निरोगी स्त्रीच्या मायटोकॉन्ड्रियाचा परिणाम होतो. हे सर्व केल्यानंतर ते गर्भामध्ये स्थापित केले जाते. या प्रक्रियेत खूप काळजी घ्यावी लागते. वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टिकोनातून या प्रक्रियेत अनेक आव्हाने आणि धोके आहेत, मात्र आता त्याला यश आले आहे.