जगभरातील जून्या आणि ऐतिहासीक गोष्टी सांभाळून ठेवण्यात ब्रिटिश म्यूजियम (British Museum) नेहमीच अग्रेसर राहिले आहे. खरे तर त्याची तीच ओळख आहे. या संग्रहालयात जगभरातील विविध संस्कृतींचे अवशेष, कलाकृती पाहायला मिळतात. असाच एक दुर्मीळ अवशेष किंवा इतिहासाचा पुरावा या संग्रहालयात आढळतो. तो म्हणजे जागातील सर्वात जुना नकाशा. विशेष म्हणजे हा नकाशा कागदापासून तयार केला नाही बरं. तर तो चक्क विशिष्ठ दगडात कोरल्याचे सांगिले जाते. संग्रहालयाचे मध्य पूर्व विभागाचे भाषाशास्त्रज्ञ, जीवाश्मशास्त्रज्ञ आणि क्युरेटर इर्विन फ्रेंकेल (Irving Finkel) यांनी याबाबत एक व्हिडिओच तयार केला आहे. जो युट्युबवर (YouTube) उपलब्ध आहे. नेटीझन्सना हा व्हिडिओ भलताच आवडला आहे.
युट्युबवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओसोबत जोडलेल्या शिर्षकामध्ये म्हटले आहे, 'जगाचा बेबीलोनियन नकाशा (Babylonian map of the world). जो आहे सुमारे 2,900 वर्षांपूर्वीचा आणि सर्वात जुना. हा नकाशा एकोणतिसशे वर्षांपूर्वी मेसोपोटामिया येथे मातीवर लिहीला गेला आणि संग्रहित करण्यात आला. हा नकाशा अर्थातच अनेक पुरवण्यांसारखा अपूर्ण आहे. दरम्यान, इरविंग फिंकेल आणि त्यांचा विद्यार्थी एडिथ हॉर्सले यांनी या नकाशाचा हरवलेला तुकडा मिळविण्यात यश मिळवले आहे.
व्हिडिओ
व्हिडिओमध्ये फिंकेल पाहायला मिळते की, ओरिजनल नकाशाची प्रतिकात्मक आवृत्ती दर्शवतात. ते सांगतात की, हा नकाशा मातीपासूनच का बनवला? व्हिडिओ पुढे सरकत राहतो तेव्हा नकाशाची ओळख दर्शवायला सुरुवात होते. ज्यमध्ये दाखविण्यात आले आहे. नकशाची व्याप्ती आणि खोलीही सांगितली जात आहे. आतापर्यंत जवळपास 1.4 लाख वेळा पाहिल्या गेलेला हा व्हिडि पाहून लोकांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिली आहे.