'डूम्सडे फिश' (Doomsday Fish) म्हणून ओळखला जाणारा एक दुर्मिळ मासा (Rare Fish Strandings) कॅलिफोर्नियातील एन्सिनिटास येथील ग्रँडव्यू बीचवर (California Beaches) किनाऱ्यावर आला. हा मासा सहसा समुद्रकिनाऱ्यावर किंवा उथळ पाण्यात आढळून येत नाही. अभ्यासकांच्या माहितीनुसार, हा मासा खोल समुद्रात असतो. पृष्ठभागाजवळ क्वचितच दिसतो. मात्र, तो अचानक आशा पद्धतीने आढळून आल्यामुले वैज्ञानिक उत्सुकता आणि लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. स्क्रिप्स इन्स्टिट्यूशन ऑफ ओशनोग्राफीमधील पीएचडी विद्यार्थी एलिसन लाफेरियर यांनी आपल्या कुत्र्यासह समुद्रकिनार्यावर फिरताना सुमारे 9-10 फूट लांबीचा हा मासा आढळून आला.
पीएचडी विद्यार्थी एलिसन लाफेरियर यांनी म्हटले की, "मला सुरुवातीला वाटले की, हे केवळ या माशाचे अवशेष असावेत. परंतू, नंतर लक्षात आले की, तो एक 'डूम्सडे फिश' आहे. स्क्रिप्स इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीने सोशल मीडियावर माहिती देताना सांगितलेकी, जर तुम्हाला वाटत असेल की, ओरफिशचा आता कालबाह्य झाला आहे. त्याचे अस्तित्व संपले आहे तर, तुम्ही हे पाहू शकता. दरम्यान, स्क्रिप्स ओशनोग्राफी मरीन वर्टेब्रेट कलेक्शनचे व्यवस्थापक बेन फ्रॅबल यांनी या माशाचा हा नमुना जतन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले. तसेच, त्यासाठी माशाच्या आवश्यक भागाचे नमुनेही घेतले. (हेही वाचा, Fisherman Becomes Millionaire: 'गोल्डन फिश' जाळ्यात, पाकिस्तानी मच्छीमार रातोरात करोडपती; जाणुन घ्या 'Sowa' ची कमाल)
खोल समुद्रात आढळणारा हा मासा पृष्ठभागावर आढळून येणे याला अनेक कारणे आहेत. खासकरुन एल निनो आणि ला निना, Red Tides आणि Santa Ana सारके जोरदार वारे यांसारख्या काही घटकांचाही प्रभाव पडतो. (हेही वाचा, Golden Fish Caught in Malpe Beach: कर्नाटकातील उडुपी येथील मालपे समुद्रकिनारी सापडला 16 किलो वजनाचा सोनेरी मासा)
"डूम्सडे फिश" हे सामान्यतः ओरफिशला दिलेले टोपणनाव आहे. हा एक दुर्मिळ आणि गूढ खोल समुद्रातील प्राणी (मासा) आहे. जो त्याच्या लांब, फितीसारखे शरीर, आकर्षक लाल पृष्ठीय पंख आणि चंदेरी रंगासाठी ओळखला जातो. वैज्ञानिकदृष्ट्या, हा रीगॅलेकस वंशातील आहे आणि जगातील सर्वात लांब हाडांच्या माशांपैकी एक आहे, जो 36 फूट लांबीपर्यंत वाढण्यास सक्षम आहे.
किनाऱ्यावर आलेला हाच तो दुर्मिळ मासा
Look what decided to make another appearance! 🌊 Last week, another #oarfish washed up on Grandview Beach in Encinitas and was spotted by Scripps Oceanography PhD candidate Alison Laferriere. This cool creature measures roughly 9 to 10 feet long. pic.twitter.com/gJjc9BBLwc
— Scripps Institution of Oceanography (@Scripps_Ocean) November 13, 2024
महत्त्वाचे म्हणजे या हा मासा ऐतिहासिकदृष्ट्याही बराच प्रसिद्ध आहे. जपान आणि आशियातील इतर भागांतील लोककथा यांमध्ये याचा संबंध आढळून येतो. जपानी पौराणिक कथांमध्ये, ओअरफिश हा नैसर्गिक आपत्तींचा, विशेषतः भूकंप आणि त्सुनामीचा अग्रदूत मानला जातो. 2011 च्या टोहोकू भूकंप आणि त्सुनामीच्या आपत्तीपूर्वी जपानच्या किनाऱ्यावर अनेक ओअरफिश किनाऱ्यावर वाहून आले होते. अशाच काही घटनांचा संदर्भ लावत लोक त्याचा संबंध अप्रिय घटनांशी जोडतात.
अभ्यासक सांगतात की, एल निनो आणि Red Tides यासारख्या घटना देखील या माशांच्या वर्तनावर प्रभाव टाकू शकतात. त्याचे अशुभ टोपणनाव असूनही, ओरफिशचा आगामी भूकंपांशी थेट संबंध असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. तथापि, त्याचे दुर्मिळ स्वरूप सागरी जीवशास्त्रज्ञ आणि सामान्य जनता आणि अभ्यासकांना आकर्षित करते.