Polar Bear Viral Video | (Photo Credit - Twitter)

बर्फाळ प्रदेशात बिनदिक्कत वावरणारे पांढरे अस्वल म्हणजेच ध्रुवीय अस्वल (Polar Bear) सर्वांनाच आकर्शीत करते. याच अस्वलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Polar Bear Viral Video) झाला आहे. जो नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतो आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, बर्फावरुन चालताना काही विशिष्ट ठिकाणी हे अस्वल पायांवर न चालता पोटावर घसरत निघाले आहे. त्याने असे का केले असावे हा प्रश्न आपल्याला सहाजिकच पडला असेल. त्यासाठी हा व्हिडिओ आपण पाहू शकता.

भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी सुप्रिया साहू यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शन दिली आहे की, अत्यंत कठीण काळात बर्फाची चादर न तोडता त्यावर कसे चालावे, याचा सर्वोत्तम धडा. या व्हिडिओला सोशल मीडियावर नेटीझन्सनी चांगलाच प्रतिसाद दिला. अनेकांनी ध्रुवीय अस्वलाने चालण्याऐवजी सरकून बर्फाची चादर तुटू नये याची खात्री कशी केली यावर प्रकाश अधिक टाकला आहे. (हेही वाचा, Bear vs Tiger Viral Video: अस्वल आणि वाघ यांच्यात जोरदार लढाई, कोण जिंकले? (पाहा व्हिडिओ))

ट्विट

ट्विट

ट्विट

अभ्यासक सांगतात की, बर्फाळ प्रदेशामध्ये सर्वत्र बर्फ असते. अशा वेळी बर्फाचा थर जमा होऊन सकल भागात एक बर्फाच्छादित भूभाग तयार होतो. हा भूभागअनेकदा फसवा असतो. कारण त्याची जाडी कमी अधिक प्रमाणात राहते. अशा वेळी जर अधिक वजन पडले तर तो बर्फाचा थर फुटतो आणि त्या ठिकाणी मोठे भोक पडते. अशा वेळी बर्फाच्या पृष्टभागावर उभा असलेला माणूस, प्राणी, वस्तूक खाली पाण्यात जाण्याची शक्यता असते. हा प्रकार जीवघेणा असतो.

ट्विट

पांढरे अस्वल हे मुळाच बर्फाळ प्रदेशातील प्राणी असल्याने त्याला निसर्गाच्या खाचाखोडी माहिती असतात. त्यामुळे बर्फावरुन चालताना विशेषत: धोकादायक ठिकाणांहून जाताना ते थेट उभार राहून चालत नाही. तसे केले तर त्याच्या शरीराचे वजन प्रमुख चार ठिकाणीच केंद्रीत होते. त्यामुळे बर्फ फुटून जाण्याची भीती असते. त्या ऐवजी ते आपले दोन्ही पाय पसरवून पोट बर्फावर ठेवणे पसंत करते. तसेच, आपल्या चारही पायांनी हळूहळू पोटावर सरपटत अंतर पार करण्याचा यशस्वी प्रयत्न करते. ज्यामुळे त्याच्या शरीराचे वजन समतल पातळीवर राहते. जेणेकरुन बर्फ फुणयाची फारशी भीती राहात नाही.