Bear vs Tiger Viral Video: अस्वल आणि वाघ यांच्यात जोरदार लढाई, कोण जिंकले? (पाहा व्हिडिओ)
Bear vs Tiger | (Photo Credit - Twitter)

वाघ (Tiger) नुसता पाहिला तरी अनेकांना धडकी बसते. जंगलातील अनेक वन्य प्राणी, वन्यजीव (Animals) वाघाला टरकून असतात. आपल्या पंजाने अनेकांना घायाळ करणारा वाघ अनेकदा आपण पाहिला असेल. पण, असाच एक वाघ अस्वलाच्या नादी लागला आणि फसला. अस्वल (Bear) अशी काही वाघावर चाल करते की, माघार घेऊन वाघ धूम ठोकतो. अस्वल आणि वाघ (Bear vs Tiger Viral Video) यांच्यात सुरु असलेली जंगलातील (Forest Viral Video) जीवनमरणाची लढाई कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडिओ जोरदार व्हायरल (Viral Video) होतो आहे. सोशल मीडियावर अनेकानी हा व्हिडिओ पाहून रंजक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी व्हिडिओ शेअर केला आहे तर काहींनी लाईक केला आहे. आपणही हा व्हिडिओ पाहू शकता.

व्हिडिओत पाहायला मिळते की एका अस्वलाला पाहून वाघ डरकाळी फोडतो. त्याच्या अंगावर धावून जातो. मग अस्वल पहिला वार करते. अस्वलाच्या एकाच पंजात वाघ थेट जमीनवर पडतो. पण तो पुन्हा उठतो आणि अस्वलावर चाल करुन जातो. मग काय.. अस्वलही माघार घेत नाही. दोघेही एकमेकांवर तुटून पडतात. दोघांमध्ये जाम टसन होते. शेवटी वाघाची ताकद कमी पडते. तो माघार घेतो आणि पळू लागतो. मग अस्वलालाही काहीसा आत्मविश्वास येतो. ते उठते आणि वाघाचा पाटलाग करते. शेवटी वाघ अस्वलापासून दूर पळतो आणि स्वत:ची सुटका करुन घेतो. (हेही वाचा, Bull Jumps Viral Video: वळूची हवेत उडी, अनकांनी म्हटले व्वा! सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल)

ट्विट व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @BoskyKhanna नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आहे. आतापर्यंत हजारोंच्या संख्येने हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ @BoskyKhannaआयएपएस प्रवीण कासवान यांनाही टॅक केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, आम्ही नेहमीच विचार करतो की वाघ हा धाडसी आणि धोकादायक प्राणी आहे. अनेक प्राणी त्याच्यासमो नांगी टाकून असतात. पण इथे तर उलटेच दिसते आहे. अस्वल वाघावर भारी पडले आहे. इतरही युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.