सोशल मीडियावर (Social Media) असंख्य गोष्टी व्हायरल होतात. त्यातल्या काहीच अशा असतात की ज्या पाहून काहीतरी मजेशीर आणि आव्हानात्मक पाहिल्याचे समाधान वाटते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडिओ आहे एका वळूचा. होय, वळू म्हटलं की सहाजिकच आपल्यापुढे एक धष्टपुष्ट असा तरणा बांड बैल किंवा रेडा येतो. या व्हिडिओतही असाच एक तरणा बांड खोंड असलेला वळू पाहायला मिळतो. जो नदी पार करताना एक जबरदस्त झेप (Bull Jumps Viral Video) घेताना पाहायला मिळतो. व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही कदाचित लक्षात येईल की, या वळूचे इतके का कौतुक होते आहे.
आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. जो जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, आम्ही आमच्या सीमा स्वत:च तयार करतो. मनात आणले तर प्रत्येक सीमा भेदू शकतो. या 5 सेंकंदाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, हा वळू एका क्षणात हवेत झेपावतो आणि एकाच दमात नदीच्या दुसऱ्या टोकाला जाऊन पोहोचतो. वळूचा हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि आश्चर्यही वाटले आहे. (हेही वाचा, Dog Riding Horse: कुत्र्याची घोडेस्वारी, High Jump पाहून सोशल मीडियावर युजर्सनाही वाटले कौतुक (Funny Video Of Animal))
व्हिडिओ
अपनी हदें हम खुद तय करते हैं. ठान लें तो हर बाधा एक छलांग में ही लांघ सकते हैं.#ThursdayMotivation #Inspiration #NeverGiveUp pic.twitter.com/dpLqnntCAy
— Dipanshu Kabra (@ipskabra) December 9, 2021
व्हिडिओत दिसते की एका वळूला नदी ओलांडायची असते. मात्र, मध्येच खोल दरीत असलेली ही नदी. त्यात वेगाने वाहणारे पाणी. नदी कशी पार करावी हा साधा विचारही त्या वळूच्या मनात आला नाही. त्याने क्षणाचाही विलंब न लावता एक उंच झेप घेतली आणि थेट ती नदीच पार केली. अनेकांना हा व्हिडिओ आवडला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत 17 हजार पेक्षाही अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी लाईक आणि शेअरही केला आहे.