Dog Riding Horse: कुत्र्याची घोडेस्वारी, High Jump पाहून सोशल मीडियावर युजर्सनाही वाटले कौतुक (Funny Video Of Animal)
Dog Riding Horse | (Photo Credits: Twitter)

सोशल मीडिया (Social Media) म्हणजे एक मजेशीर ठिकाण. इथे कधी कधी इतके मजेदार व्हिडिओ (Funny Video) पाहायला मिळतात की पुरेपूर मनोरंजन होते. कधी हे व्हिडिओ मानसांचे असतात तर कधी प्राण्यांचे. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्याचे युजर्सनी जोरदार कौतुक केले आहे. हा व्हिडिओ एक घोडा आणि कुत्रा (Dog And Horse) यांचा आहे. कुत्रा घोड्याच्या पाठीवर बसून घोडेस्वारीचा (Dog Riding Horse) आनंद घेताना दिसतो आहे. कुत्रा, मांजर, माकड, हत्ती यांच्याप्रमाणे हासुद्धा व्हायरल व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ @hopkinsBRFC21 नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओत आपण पाहू शकता की, एक घोडा एका कुत्र्यालाआपल्या पाठीवर घेऊन धावतो आहे. कुत्राही या खास घोडेस्वारीचा आनंद घेतो आहे. कुत्र्याचा रंग पांढरा आहे. घोडा काहीसा काळ्या रंगाचा आणि बसका म्हणजे कमी उंचीचा आहे. घोड्याचे तोल सावरणे आणि कुत्र्याचे त्याच्या पाठीवर आरामात बसणे पाहून दोघांनीही योग्य प्रशिक्षण घेतले आहे असेच वाटते. एखाद्या कसलेल्या घोडेस्वाराप्रमाणे कुत्रा घोड्यावर बसला आहे. (हेही वाचा, Viral Video: जंगली घोड्यांनी चोरले Baby Stroller; फ्लोरिडामधील विचित्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

व्हिडिओ

कुत्र्याची घोडेस्वारी सोशल मीडियावर अनेकांना आवडलीआहे. हे वृत्त लिहीपर्यंत हा व्हिडिओ दोन हजार पेक्षाही अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी शेअर तर काहींनी लाईक केला आहे. या व्हिडिओच्या व्ह्युवर, लाईक आणि शेअर्सची संख्या हळूहळू वाढते आहे. एका युजर्सने या व्हिडिओ प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, अद्भूत, दुसऱ्याने म्हटेल आहे की, कुत्रा आणि घोड्याचे टॅलेंट कौतुकास्पद आहे.