Viral Video: जंगली घोड्यांनी चोरले Baby Stroller; फ्लोरिडामधील विचित्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Baby Stroller stolen by wild horses (Photo Credits: Twitter)

Viral Video: आपण यापूर्वी घोड्यांचे (Horses) अनेक व्हिडिओ पाहिले असतील. परंतु, तुम्ही घोड्यांना कधी चोरी करताना पाहिले आहे का? होय, जरी हे आश्चर्यकारक वाटत असलं, तरी हे खरे आहे. खरं तर, अशी एक विचित्र घटना फ्लोरिडामध्ये (Florida) घडली आहे. जिथे जंगली घोड्यांनी (Wild Horses) एका जोडप्याचे बेबी स्ट्रॉलर (Baby Stroller) चोरले. या विचित्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. ट्विटर यूजर डिकेम्बे (Dikembe) यांनी या घटनेची माहिती देणारा व्हिडिओ शेअर केला आहे.

ट्विटरवरील आपल्या पोस्टच्या माध्यमातून डिकेम्बे यांनी सांगितले की, 21 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेला तिचा प्रियकर साक्षीदार आहे. डिकेम्बेने आपल्या प्रियकरासोबतच्या संभाषणासह स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. ज्यात या विचित्र घटनेचा उल्लेख आहे. या व्हिडिओमध्ये एक जंगली घोडा बेबी स्ट्रॉलर लोटताना दिसत आहे. (हेही वाचा - Wedding Decorations: सुरत येथील लग्नात तब्बल 6 कोटींचे डेकोरेशन? फुलांची सजावट, झुंबर, खास बैठक व्यवस्था, पहा व्हायरल होत असलेल्या भव्य समारंभाचा व्हिडिओ)

दरम्यान, सध्या या विचित्र घटनेची व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत साडेचार हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत आणि ट्विटर वापरकर्त्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये दोन घोडे बेबी स्ट्रॉलरसोबत खेळत आहेत.