Wedding Decorations: सुरत येथील लग्नात तब्बल 6 कोटींचे डेकोरेशन? फुलांची सजावट, झुंबर, खास बैठक व्यवस्था, पहा व्हायरल होत असलेल्या भव्य समारंभाचा व्हिडिओ
Wedding Decorations for 6 Crore (Photo Credits: Twitter)

लग्न (Wedding) हे फक्त दोन जीवांचे मिलन नसून याद्वारे दोन कुटुंबे एकत्र येतात. म्हणूनच की आपल्या आयुष्यातील हा क्षण अगदी खास असावा असे प्रत्येकालाच वाटते. भारतामध्ये ‘लग्न’ या गोष्टीला फार महत्व आहे. लग्नाची सजावट, खाणेपिणे, कपडे, दागिने, पाहुण्यांचे आदरातिथ्य, विविध कार्यक्रम अशा अनेक गोष्टींचा समावेश भारतीय लग्नामध्ये असतो. काही ठिकाणी तर 7-8 दिवस लग्न चालते. सध्या अशाच एका लग्नाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या लग्नातील फक्त सजावटच तब्बल 6 कोटी रुपयांची असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे लग्न गुजरातच्या सुरत (Surat) येथे पार पडल्याचे म्हटले जात आहे. कोरोना विषाणूमुळे लोकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली असताना, लॉकडाऊनमध्ये पैशापाई अनेक लग्न पुढे ढकलली जात असताना, सुरतच्या या लग्नात 6 कोटींची सजावट पाहायला मिळाल्याने हे लग्न चर्चेत आले आहे. सध्या भारतामध्ये लग्नासाठी फक्त 100 पाहुण्यांनाच परवानगी आहे. अशावेळी या 100 लोकांसाठीच ही खास सजावट केली गेली होती. (हेही वाचा: Baba Ka Dhaba चे मालक Kanta Prasad यांनी दिल्लीमध्ये सुरू केलं नवीन रेस्टॉरंट; पहा फोटोज)

नेटिझन्सनी या लग्नाच्या ठिकाणचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये खास फुलांची सजावट, चमकदार लाईट्स, खास दिवे, स्पेशल मंडप, पाहुण्यांना बसण्याची खास सजावटीची बैठक व्यवस्था, झुंबर, फुलांच्या माळा अशा गोष्टी दिसत आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारी ही सजावट पाहून हा कोणत्यातरी महागड्या चित्रपटाचा सेटच असावा असा भास होतो. मात्र तब्बल 6 कोटींची गुंतवणूक केली गेलेले हे लग्न नक्की कोणाचे होते याबद्दल काही माहिती मिळू शकली नाही.

एका मोठ्या मैदानावर हा विवाहसोहळा पार पडल्याचे दिसत आहे. जिकडे नजर फिरवेल तिकडे फक्त सजावटच दिसून येत आहे. विविध प्रकारची फुले आणि भन्नाट आयडीयाज वापरून ही सजावट केली गेली आहे. दरम्यान, याआधीची भारतामधील अशा महागड्या लग्नाचे व्हिडिओज व्हायरल झाले होते. दोन वर्षांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या इशा अंबानीचे लग्नही असेच गाजले होते.