stone pelting Surat PC X

Surat: देशभरात सर्वीकडे गणेशोत्सवचा आनंद आणि उत्साह सुरु आहे. त्यात गुजरात येथील सूरत येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. सूरत शहरात गणेशोत्सव सुरु असताना एका मंडळावर काही लोकांनी दगडफेक केली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. बाप्पाच्या मंडळावर दगडफेक केल्याल्या तरुणांना भाविकांनी पकडले आहे आणि पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (हेही वाचा- मुंबईतील लालबागचा राजा मंडळात देणग्या मोजणीला सुरुवात (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, सुरत येथील सय्यदपूरा भागात गणेश पंडालवर सहा जणांनी दगडफेक केली. दगडफेकची माहिती मिळताच, लालगेट आणि चौक बाजार पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. दगडफेकीच्या घटनेनंतर अनेक गणेश भक्त संतापले. त्यांनी आंदोलन सुरु केले. संतापलेल्या भाविकांनी वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे परिस्थिती आणखीन चिघळली.

गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी सोमवारी सांगितले की, दगडफेकच्या घटनेनंतर सहा जणांना अटक केलेआणि तसेच या घटनेला प्रोत्साहन देणाऱ्या इतर २७ जणांनाही पोलिसांनी अटक केले. दगडफेकच्या घटनेनंतर दोन गटांत हाणामारी देखील झाली.

या घटनेबाबत बोलताना सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंग गेहलोत यांनी ANI ला माहिती दिली की, "काही मुलांनी गणेश पंडालवर दगडफेक केली, त्यानंतर हाणामारी झाली. पोलिसांनी त्या मुलांना ताबडतोब तेथून दूर नेले...पोलिसांना तातडीने परिसरात तैनात करण्यात आले. ज्या ठिकाणी लाठीचार्ज केला गेला आणि अश्रुधुराचा वापर केला गेला... त्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे."