Marathi Tomane | Representational image (Photo Credits: pixabay)

Best Marathi Taunt Quotes for Relative: भाषा आणि टोमणा यांचे नाते अत्यंत निकटचे. त्यामुळे सहाजिकच मराठी भाषेतही टोमण्यांना खास महत्त्व आहे. अर्थात तो भाषेचा एक वेगळा अलंकार असला तरी सर्वांनाच तो छान पद्धतीने वापरता येतोच असे नाही. अनेकदा तर त्याचा वापर करताना संयम आणि उच्चार, विचारांचा तोल सांभाळला नाही तर भलताच अर्थ निघून वाद निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पण काही असले तरपी आपणास जे म्हणायचे आहे ते स्पष्ट न बोलता आडवळणाने इतर शब्दरचनेच्या माध्यमातून आपले म्हणने जसेच्या तसे इतरांपर्यंत पोहोचविण्याचे काम टोमण्याद्वारे होते. आजकाल इंटरनेट आणि सोशल मीडिया, व्हॉट्सअॅपचा जमाना आला आहे. त्यामुळे WhatsApp Status ठेऊन नातेवाईक आणि मित्रपरीवाराला टोमणे मारण्याची कलाही अनेकांना अवगत झाली आहे. अशा मंडळींसाठी काही खास टोमणे येथे देत आहोत.

  • मोठी स्वप्नं पाहणारे अनेक लोक सकाळी 10 वाजता उठतात.
  • दात निट घासले तर तुमच्या असण्यासोबतच तुमचं हसणंही लोकांना आवडतं.
  • चांगल्या कामात मांजरे कमी माणसेच अधिक आडवी येतात.
  • अनेकांसाठी खाण्यातील बदल म्हणजेच उपास.
  • रिकाम्या डोक्याची माणसं मोकळ्या मनाची असतात. दुर्दैव म्हणजे ती आपल्या आजूबाजूलाच दिसतात. (हेही वाचा, Political Status and Marathi Taunt: राजकीय स्टेटस आणि मराठी टोमणे)
  • लोकं बोटंच दाखवतात म्हणून नाराज नका होऊ. जे आपल्याला घाबरतात तेच दुरुन बोट दाखवतात.
  • दोस्ताची बाईक म्हणजे दुष्काळी विहीर. कायम बिनपाण्याची.
  • मी मोजक्याच लोकांसोबत असतो. कारण, 100 श्वानांपेक्षा 5 सिंहांसोबत राहणे कधीही उत्तम.
  • नातेवाईकांच्या टीकेने, अपयशाने खचू नका. लोखंडाने सोन्याचे तुकडे केले म्हणून किंमत कमी होत नाही.
  • पराचा कावळा कशाला करता? गुलाबाला मिठी मारायची तर काटे टोचणारच ना?
  • टोमणे मारणं ही एक कला आहे. पण मारलेला टोमणा समजून न समजल्या सारखं वागणं, ही त्याहून ही मोठी कला आहे.
  • खोट्या मनाच्या लोकांना मी मोठ्या मनाने माफ करतो. हे फक्त त्यांना कळत नाही.

अर्थात टोमणे मारणे प्रत्येक वेळी योग्य ठरतेच असे नाही. पण शब्द आणि भाषेवर पकड असेल तर त्याचा हत्यारासारखा वापर करता येऊ शकतो. अनेकदा भाषण, समान्य संवाद आणि विरोधकांवर प्रहार करण्यासाठी टोमण्यांचा वापर केला जातो. दैनंदिन जीवनातही टोमणे मारणे ही अनेकांची खासियत असते. अर्थात अनेक लोक जाणीवपूर्वक हे करत नाहीत. पण, त्यांच्या भाषेची ती लकब असल्याने अशा लोकांकडून जी वाक्यरचणा होते ती कदाचित समोरच्याला टोमणा वाटू शकते.