सोशल मीडीयामध्ये अनेक मेसेज कोणत्याही तथ्यांची तपासणी न करता फॉर्वर्ड केले जातात. त्यामुळे फेक न्यूज झपाट्याने पसरल्या जातात. सध्या व्हॉट्सअॅपवर असाच वायरल होत असलेला एक मेसेज म्हणजे भारत सरकार ऑनलाईन शिक्षणासाठी सार्या भारतीयांना 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज देणार आहे. दरम्यान पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) या ट्वीटर अकाऊंट द्वारा या वायरल मेसेजची पोलखोल करण्यात आली आहे. त्यांच्या कडून हा वायरल व्हॉट्सअॅप मेसेज खोटा आहे. अशाप्रकारे भारत सरकारकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
व्हॉट्सअॅप मेसेज मध्ये दिलेल्या माहितीनुसार, एअरटेल, जिओ आणि Vi सीम वापरणार्यांकरिता 3 महिन्यांसाठी ही ऑफर्स असणार आहे. त्याचा फायदा मिळवण्यासाठी एका लिंकवर क्लिक करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. मात्र हा बनावट मेसेज आहे. अशाप्रकारे अनोळखी लिंक वर क्लिक करणं धोकादायक ठरू शकतं. खाजगी माहितीवर डल्ला टाकण्याचा यामधून प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पीआयबी कडून करण्यात आले आहे.
पहा पीआयबी ट्वीट
एक वायरल #WhatsApp मैसेज में दावा किया जा रहा है कि भारत सरकार ऑनलाइन पढ़ाई के लिए सभी भारतीय यूजर्स को 3 महीने का रिचार्ज फ्री में दे रही है।#PIBFactCheck:
➡️यह दावा #फ़र्ज़ी है।
➡️भारत सरकार ने ऐसी कोई घोषणा नहीं की है। pic.twitter.com/7OkZd3eNqZ
— PIB Fact Check (@PIBFactCheck) March 7, 2022
दरम्यान कोरोना लॉकडाऊन काळातही अशाप्रकारे खोट्या लिंक्स शेअर करत नेटकर्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. मागील काही महिन्यात या सायबर क्राईम पासून दूर राहण्याचं आवाहन वारंवार केले जात आहे. तुम्हांला सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर मिळणार्या माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवणं टाळा. माहितीची खात्री करा. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवा.