Fact Check: रेल्वे प्रवाशांसमोर मोदी सरकारच्या यशाचे गीत गाण्यासाठी तब्बल 3 हजार भिकाऱ्यांची होणार निवड? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मॅसेजचा PIB कडून खुलासा

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून (Social Media) खोट्या माहितीचा (Fake News) प्रसार करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. सध्या सोशल मीडियावर एका वृत्तपत्राच्या संपादकीय पानाचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात रेल्वे प्रवाशांसमोर मोदी सरकारच्या यशाचे गीत गाण्यासाठी तब्बल 3 हजार भिकाऱ्यांची होणार निवड केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. या माहितीचा पीआयबीकडून (PIB) तपास करण्यात आला असून ही संपूर्ण माहिती खोटी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाशी लढत आहे. मात्र, या संकटकाळात फेसबूक, ट्वीटर, व्हॉट्सअ‍ॅपसह अन्य सोशल प्लॅटफॉर्मवर खोट्या माहितीचा प्रसार करून अनेकांची दिशाभूल केली जात आहे. दरम्यान, सोशल मीडिया व्हायरल होणाऱ्या खोट्या माहितीचा तपास करण्याची जबाबदारी सरकारने पीआयबी संस्थेकडे सोपवली आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची सत्यता तपासण्याचे आवाहनही सरकारकडून करण्यात आले आहे. हे देखील वाचा- Schools Will Remain Shut Till December: डिसेंबर 2020 पर्यंत शाळा बंंदच राहणार? पहा सोशल मीडिया वरील व्हायरल न्युज मागील Fact Check

ट्वीट-

महत्वाचे म्हणजे, सोशल मीडियावर उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवणे चुकीचे आहे. कोणत्याही गोष्टीची पडताळणी केल्याशिवाय सरकारी योजना आणि स्किम्स वर विश्वास ठेवणे चुकीचे ठरेल. त्यातून फसवणूक होण्याची शक्यता आहे, माहितीची सत्यता जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकच्या pib.nic.in किंवा लेटेस्टलीला भेट द्या.