Schools Will Remain Shut Till December: देशभरात कोरोना व्हायरसचा प्रसार वार्याच्या वेगाने होत आहे. लेटेस्ट अपडेटनुसार देशात आजवर 24,61,191 कोरोनाबाधित आढळुन आले आहेत. एकीकडे कोरोना पसरत असताना मागील काही काळात सोशल मीडियावर फेक न्युज सुद्धा तितक्याच वेगाने पसरत आहेत, आज आम्ही अशाच एका व्हायरल न्युज मागील सत्य आपल्याला सांगणार आहोत. केंद्र सरकारच्या नावाने अनेक बड्या वृत्तपत्रांंचे नाव घेउन सोशल मीडियावर देशातील शाळा पुन्हा सुरु होण्याच्या बाबत ही न्युज आहे, कोरोनामुळे गंंभीर झालेली परिस्थिती पाहता डिसेंबर 2020 पर्यंत शाळा बंंदच राहणार असा दावा या न्युज मध्ये केला आहे, मात्र मुळातच केंद्र सरकारकडुन याबाबत घोषणा किंबहुना चर्चा सुद्धा झालेली नाही त्यामुळे या वृत्ताला काहीच हातपाय नसल्याचे स्पष्ट होते.
वास्तविक शाळा कॉलेज पुन्हा सुरु कधी होणार याविषयी आता सर्वांनाच प्रश्न आहेत, अशावेळी मोठ्या वृत्तपत्रांंच्या हवाल्याने माहिती समोर येत असल्याचे सांगणार्या या पोस्ट खर्या वाटणे शक्य आहे, मात्र तुम्हाला अधिकृत माहिती हवी असल्यास कोणत्याही न्युज च्या ऑफिशियल वेबसाईट तसेच सरकारी साईटस व अकाउंट तपासुन पाहत जा. अद्याप तरी शाळा आणि कॉलेज पुन्हा सुरु करण्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
पहा व्हायरल ट्विट
Schools will remain closed until December - Central Governmenthttps://t.co/RS3R3KAXO9
— Prof. Bholanath Dutta 🇮🇳 , Ex-Indian Air Force (@BholanathDutta) August 13, 2020
Schools will remain closed until December – Central Government https://t.co/lZrTe7hMkr
— GNS ONLINE.COM (@GnsOnline) August 12, 2020
Schools will remain closed until December – Central Government https://t.co/PKCh5WrfbJ
— The Voice Of Kashmir (@TheVoiceOfKash1) August 13, 2020
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर 24 मार्च पासुन लागु करण्यात आलेल्या लॉकडाउन अंतर्गत शाळा कॉलेज बंंद करण्यात आले आहेत. जुलै पासुन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातुन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली आहे. येत्या 1 ते 14 सप्टेंबर पासून शाळा पुन्हा सुरु कराव्यात याबाबत केंद्र सरकाचा विचार सुरु आहे. लवकरच त्यावर निर्णय होऊ शकतो, मात्र अजुनही अधिकृत घोषणा झालेली नाही त्यामुळे अफवांंना बळी पडु नका.