Fact Check: AYUSH योजने अंतर्गत सरकार लोकांना देणार मासिक आर्थिक भरपाई? PIB ने केला खुलासा
Fake News (Photo Credits: Twitter)

मोदी सरकारने देशातील गरीब आणि गरजू लोकांसाठी आयुष्यमान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) सुरु केली आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असे देखील या योजनेचे नाव आहे. मोदी केअर नावाने प्रचलित असलेली ही योजना खरं तर हेल्थ इंश्योरन्स स्कीम आहे. या योजनेअंतर्गत देशातील कोटींहून अधिक कुटुंबियांना 5 लाखांहून अधिक रुपयांचा स्वास्थ्य वीमा मिळतो. गेल्या वर्षी कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे (Coronavirus Lockdown) अनेक लोकांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागेल. अनेकांना आपल्या नोकरीला मुकावे लागले. या बेरोजगारीचा सामना काहीजण अजूनही करत आहेत. यादरम्यान, सोशल मीडियावर एक बातमी जोरदार व्हायरल होत आहे. मोदी सरकार आयुष योजनेअंतर्गत (AYUSH Yojana) लोकांना मासिक आर्थिक भरपाई देत आहे, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे.

प्रेस इंफोर्मेशन ब्यूरो ने या बातमीमागील सत्य तपासले असून त्याचा उलघडा केला आहे. हा व्हायरल मेसेज फेक असून भारत सरकारकडून अशी कोणतीही योजना सुरु नसल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे. तसंच अशा प्रकारच्या फेक न्यूजपासून सावध राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. (Fact Check: भारतीय रेल्वे 1 एप्रिल 2021 पासून सर्व ट्रेन्स सुरु करणार? PIB ने केला व्हायरल बातमी मागील खुलासा)

Fact Check By PIB:

मोदी सरकारने 25 डिसेंबर रोजी एबीवाय योजना सुरु केली आहे. या माध्यमातून सरकार गरीब, गरजू आणि शहरातील गरीब कुटुंबांना स्वास्थ्य वीमा उपलब्ध करुन त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देते. दरम्यान, यापूर्वी देखील अशा प्रकारच्या अनेक फेक न्यूज व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात येते.