Fact Check: भारतीय रेल्वे 1 एप्रिल 2021 पासून सर्व ट्रेन्स सुरु करणार? PIB  ने केला व्हायरल बातमी मागील खुलासा
Fake News (Photo Credits: Twitter/PIB)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटकाळात अनेक फेक बातम्यांना उधाण आहे. आता देखील अशीच एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या 1 एप्रिल 2021 पासून भारतीय रेल्वे (Indian Railway) सर्व ट्रेन्स सुरु करणार असा दावा करण्यात आला आहे. तसंच सध्या केवळ 65 टक्के ट्रेन्स सुरु करण्यात आल्याचेही यात म्हटले आहे. ही बातमी सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून जोरदार व्हायरल होत आहे. (Fact Check: मोदी सरकार 'प्रधानमंत्री सबका साथ सबका विकास योजने' अंतर्गत प्रत्येकाला 1 लाख रुपयांचे वाटप करत आहे; जाणून घ्या सत्य)

प्रेस इन्फोरमेशन ब्युरो (Press Information Bureau) ने या व्हायरल बातमी मगील सत्य शोधले असून ही बातमी फेक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसंच सर्व ट्रेन्स सुरु करण्याची कोणतीही घोषणा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलेली नसल्याचे देखील पीआयबीने स्पष्ट केले आहे.

Fact Check By PIB:

सरकार आणि इतर एजन्सीकडून वेळोवेळी लोकांना अशा चुकीची माहिती पसरवणाऱ्या सोशल मीडिया पोस्टपासून सावध सांगितले जाते. अशा फसव्या पोस्टला बळी न पडण्याचे तसंच मेसेजमागील सत्य पडताळणी केल्याशिवाय आपली माहिती न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची सत्य माहिती मिळवण्यासाठी सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.