Fact Check: मोदी सरकार 'प्रधानमंत्री सबका साथ सबका विकास योजने' अंतर्गत प्रत्येकाला 1 लाख रुपयांचे वाटप करत आहे; जाणून घ्या सत्य
Fact Check (PC - PIB)

Fact Check: व्हॉट्सअ‍ॅप संदेशामध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार 'प्रधानमंत्री सबका साथ सबका विकास योजने' अंतर्गत सर्व नागरिकांच्या खात्यात 1 लाख रुपये जमा करीत आहे. जर तुम्हालाही असा संदेश मिळाला असेल तर सावधगिरी बाळगा. त्यासंबंधित लिंक उघडू नका. तसेच आधार, पॅन, बँक खाते, ओटीपी यासारखी कोणतीही माहिती देऊ नका. हा एक बनावट मेसेज आहे. हा दावा पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये बनावट असल्याचे आढळले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने स्वतः हा दावा बनावट असल्याचं आपल्या अधिकृत ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पीआयबी ही भारत सरकारची धोरणे, कार्यक्रम उपक्रम आणि कृत्ये याबद्दल वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना माहिती देणारी प्रमुख संस्था आहे. हा दावा बनावट असल्याचे पीआयबीने नमूद केले आहे. केंद्र सरकारकडून अशा कोणत्याही योजनेशी संबंधित कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. (वाचा - Fact Check: शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यानंतर पॉप सिंगर रिहाना चा हातात पाकिस्तानच्या झेंडा घेतलेला फोटो व्हायरल; जाणून घ्या सत्य)

सरकारशी संबंधित कोणतीही बातमी सत्य आहे किंवा नाही याची माहिती घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. व्हायरल मेसेजमागील सत्यता तपासण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकवर कोणीही स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा व्हॉट्सअ‍ॅप नंबर 918799711259 वर किंवा pibfactcheck@gmail.com या मेलवर माहिती पाठवू शकतात.