Chrysopelea Ornata | (Photo credit: archived, edited, representative image)

विस्तिर्ण समुद्रकिनारपट्टी, घनदाट झाडी आणि समृद्ध अशी जलसंपदा लाभलेला आदिवासी बहुल जिल्हा पालघर (Palghar) उडणारा साप (Flying Snake) आढळल्याने चर्चेत आला आहे. जिल्ह्यातील डहाणू (Dahanu Taluka) तालुक्यातील बोर्डी नजीक असलेल्या खुनावडे (Khunavade) गावात दिनेश शेट्टी यांच्या फार्म हाऊसमध्ये हा साप आढळून आला. क्रायसोपेलिया ऑर्नाटा (Chrysopelea Ornata Snake) असे शास्त्रिय नाव असलेला हा साप अत्यंत दुर्मिळ म्हणून ओळखला जातो. खास करुन या सापाचा वावर हा साप महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, गडचिरोली, कोकण, आंबोली घाट या प्रदेशात आढलतो. इतरत्र तो फार क्वचित दिसतो. या सापाला शेलाटी या स्थानिक नावानेही ओळखले जाते. दक्षिण आणि आग्नेय आशियात हा साप अधिक प्रमाणावर आढळून येतो.

उणारा साप की सोनसर्प?

उडणारा साप आढळ्याची माहिती मिळताच नागरिकांचे कुतुहल जागृत झाल्याने त्यांनी साप दिसलेल्या ठिकाणी जमण्यास सुरुवात केली. दरम्यान, या सापाबाबत खबर मिळताच वन विभाग आणि ‘वाईल्ड वेल्फेअर असोसिएशन’ची ‘रेस्क्यू टीम’ या ठिकाणी पोहोचली आणि त्यांनी पाहणी केली. वन विभागाने लगेचच हा सोनसर्प असल्याची पुष्टी केली. पालघर जिल्ह्यातील जंगलाचा पश्चिम घाटात होतो. त्यामुळे पश्चिम घाट परिसरात अद्यापपर्यंत तरी अशा प्रकारचा साप आढळल्याची नोंद नव्हती. दरम्यान, तो प्रथमच आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र, पर्यावरण प्रेमी, प्राणीमित्र आणि काही स्थानिक नागरिक या आधीही अशाच प्रकारचा साप बोर्डी गावातील चिकूवाडी आणि अस्वाली येथे आढळ्याचे सांगतात. (हेही वाचा, व्हिडिओ: उडणारा साप दाखवून 'तो' करायचा उदरनिर्वाह; भुवनेश्वर वन विभागाने केली कारवाई)

तिडक्या, उडता साप, शेलाटी, उडता सोनसर्प नावानेही प्रचलित

क्रायसोपेलिया ऑर्नाटा हा शक्यतो हिरव्या रंगाचा असतो. तो काहीसा पिवळ्या किंवा सोनेरी रंगातही आढळतो. हा शरीराने अगदीच बारीक आणि लांब असतो. पण त्याचे शरीर इतर सापांच्या तुलनेत अगदीच छोटे असते. त्याचे डोके चपटे आणि मान अरुंद असते. तो काहीसा बोथट नाकाचा असतो. त्याचे डोळे मोठे आणि गोल असतात. जे पटकण लक्षात येतात. हा साप उंच झाडांवरुन कमी उंचीच्या झाडावर येण्यासाठी झेपावतो. मोठ्या वेगाने खाली उतरताना तो आपले अंग असे काही आक्रसून घेतो की, पाहणाऱ्याला तो उडत असल्याचा भास होतो. तो झाडाच्या एका फांदीवरुन दुसऱ्या फांदीवर सहज झेपाऊ शकतो. ज्याला लोक सापाच्या उड्या किंवा साप उडाला असे म्हणतात. त्यावरुनच त्याला उडणारा साप असेही संबोधले जाऊ लागले. स्थानिक भाषेत या सापास तिडक्या साप, उडता साप, शेलाटी, उडता सोनसर्प आदी नावांनीही ओळखले जाते. बेडूक, सरडे, पाली, लहान पक्षी आणि त्यांची अंडी हे सापाचे आवडते खाद्य आहे. या प्रजातीतील मादी सर्प सहा ते बारा महिने अंडी देतो. काही काळापूर्वी हा साप सोलापूर जिल्ह्यातही आढळला होता.