Fake News on Pradhan Mantri Kanya Vivah Yojana (Photo Credits: PIB)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटकाळापासून फेक न्यूजच्या (Fake News) सातत्याने सुरु असलेल्या मालिकेत अजून एका बातमीची भर पडली आहे. सध्या सोशल मीडियावर एक युट्युब व्हिडिओ (Youtube Video) व्हायरल होत आहे. यात प्रधानमंत्री कन्या विवाह योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Kanya Vivah Yojana) सर्व मुलींना लग्नासाठी सरकारकडून 40,000 रुपये देण्यात येतील, असा दावा केला आहे. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडिया माध्यमांवर वेगाने फिरत आहे. (Fact Check: किसान विकास मित्र समिती कृषी मंत्रालयाच्या वेबसाईटद्वारे देत आहे नोकरीची संधी? PIB ने सांगितले सत्य)

प्रेस इनफार्मेशन ब्यूरोने (Press Information Bureau) या खोट्या बातमीचे खंडन केले आहे. आपल्या ट्विटमध्ये पीआयबीने युट्युब व्हिडिओमध्ये करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. तसंच केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवण्यात आलेली नाही, हे देखील स्पष्ट केले आहे.

दावा: प्रधानमंत्री कन्या विवाह योजने अंतर्गत केंद्र सरकार सर्व मुलींना त्यांच्या विवाहासाठी 40,000 रुपये देणार, असा दावा एका युट्युब व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.

पीआयबी फॅक्ट चेक: हा दावा खोटा आहे. केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही.

Fact Check by PIB:

सोशल मीडिया माध्यमांवर व्हायरल होणारी चुकीची माहिती, फेक न्यूज यामुळे अफवा पसरते. लोकांचा गोंधळ उडतो. अनेकदा फसवणूक होण्याची शक्यताही असते. त्यामुळे सोशल मीडियावरील कोणत्याही माहितीवर तथ्य तपासल्याशिवाय विश्वास ठेवू नका, असे आवाहन वारंवार करण्यात येते. तसंच पीआयबी फॅक्ट चेक कडून देखील व्हायरल खोट्या बातम्यांचा खुलासा करण्यात येतो. दरम्यान, व्हायरल होणाऱ्या बातमीचे तथ्य तुम्ही केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊनही तपासू शकता.