Fact Check: काल Solar Eclipse दरम्यान यूएस-कॅनडा बॉर्डर वर आकाशात दिसले दोन सूर्य? पहा व्हायरल फोटो मागील सत्य
Fake Image of Two Suns Appear on The US-Canada Border (Photo Credits: @indusage1/ Twitter)

Solar Eclipse Viral Images: काल, 21 जून रोजी जगभरातील अनेक ठिकाणी सूर्यग्रहण (Surya Grahan 2020)  दिसून आले. भारतात काही ठिकाणी कंकणाकृती तर काही ठिकाणी खंडग्रास स्वरूपात सूर्यग्रहण दिसले होते. वास्तविक सूर्यग्रहण ही एक नैसर्गिक खगोलीय घटना असली तरी त्याविषयी अनेकांना चमत्कारिक कुतुहूल असते. अशा लोकांचे कुतुहूल आणखीन वाढवणारी एक पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यानुसार अमेरिका (US)  आणि कॅनडाच्या (Canada)  बॉर्डर लगतच्या काही भागात काल सूर्य ग्रहणाच्या काळात चक्क दोन सूर्य (Two Suns) आकाशात दिसल्याचा दावा केला जातोय. या पोस्ट मध्ये फोटो सुद्धा असल्याने अनेक जण त्याला शेअर करत आहेत. मात्र यामध्ये नक्की तथ्य (Fact Check) किती याबाबत आता आम्ही आपणास सांगणार आहोत. कंकणाकृती सूर्यग्रहणात झालं Ring of Fire 2020 चं दर्शन; पहा हे विलोभनीय दृश्य !

सोशल मीडिया वर व्हायरल होणारे दोन सूर्य दिसत असणारे फोटो हे ओरिजनल असून त्यात मॉर्फिंग केलेलं नाही हे सत्य आहे. मात्र या फोटोमध्ये दिसणारा दुसरा सूर्य हा वास्तविक सूर्य नसून चंद्र आहे. या घटनेला मून हंटर अशा नावाने ओळखले जाते. जेव्हा पृथ्वी आपली कक्षा बदलत असते तेव्हा एकाच रांगेत आलेल्या सूर्य आणि चंद्रात अंतर निर्माण होऊन ते दोघेही एकाच वेळी आजूबाजूला दिसून येतात. सूर्याचा प्रकाशच चंद्रावर पडत असल्याने चंद्र सुद्धा चाटताना दिसून येतो. याच घटनेचे काही फोटो लोकांनी शेअर करून आपल्याला दोन सूर्य दिसल्याचा दावा केला आहे.

पहा व्हायरल फोटो

Solar Eclipse 2020: दिल्ली, जम्मू काश्मीर सह भारतातील विविध राज्यातील सुर्यग्रहणाचे फोटो पहा

दरम्यान, Hunter’s Moon हा हार्वेस्ट मून च्या नंतर येणाऱ्या पूर्ण चंद्राचे एक नाव आहे. उत्तर गोलार्ध भागात हार्वेस्ट चंद्र सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये दिसल्यावर हंटर चंद्र ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये दिसून येतो. आकाशात असणाऱ्या बर्फाच्या क्रिस्टल मुळे सूर्याची प्रतिमा हंटर मून वर पडून त्याचे प्रतिबिंब सूर्यासारखे दिसत असल्याचे वैज्ञानिकांनी म्हंटले आहे, मात्र मुळात दोन सूर्य आहेत असा दावा मात्र अगदी चुकीचा आहे.