Ring of Fire 2020। Photo Credits: Twitter/ ANI

सूर्य ग्रहणाच्या स्थितीमध्ये सूर्याच्या मध्ये चंद्र, पृथ्वी एका सरळ रेषेत येतात. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याला झाकतो, मात्र लहान आकारामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही, तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. त्यावेळेस चंद्र सूर्याच्या मध्यभागी दिसतो आणि सूर्याच्या बाह्याकाराचे कंकण दिसू लागते. आज उत्तर भारतामध्ये अनेक खगोलप्रेमी Ring of Fire 2020 याची देही याची डोळा पाहू शकले. मात्र ज्या भागात हे ग्रहण थेट उघड्या डोळ्यांनी पाहणं शक्य नाही तेथे आज ऑनलाईन माध्यमातून हे ग्रहण पाहण्याची सोय करण्यात आली होती. अनेकांनी फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप सारख्या सोशल मीडीयामधूनही Ring of Fire 2020 चे फोटो शेअर केले आहेत. नेटकर्‍यांनी शेअर केलेले फोटो झपाट्याने व्हायरल होत आहेत. Surya Grahan 2020 Mumbai Live Streaming: मुंबई मध्ये सूर्य ग्रहणाला सुरूवात; इथे पहा लाईव्ह अवकाशातील नजराणा.

दरम्यान आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेलं हे सूर्यग्रहण सुपारी 3 वाजेपर्यंत पूर्ण होईल. दुपारी 12.10 च्या सुमारास ग्रहणाचा सर्वोच्च काळ होता. त्यावेळेस अनेकांनी जमेल तसे ग्रहणा पाहण्याचा आनंद घेतला आहे. मग तुमच्याकडूनही ग्रहण पाहायचं राहिले असेल किंवा Ring of Fire 2020 चं विलोभनीय दृश्य पाहणं राहुन गेलं असेल तर हे फोटो नक्की पहा.

देहरादून मध्ये दिसली  Ring of Fire 2020

कंकणाकृती सूर्यग्रहण हे केवळ उत्तर भारतातील निवडक शहरांमध्ये पहायलं मिळलं. महाराष्ट्रात आज ग्रहणाची खंडग्रास स्थिती आहे. मुंबई, पुण्यात ग्रहण पाहण्यासाठी काही संस्थांकडून खास सोय करण्यात आली आहे. दरम्यान भारतीय समाजामध्ये ग्रहणाबाबत अनेक रूढी-परंपरा, समज-गैरसमज आहेत. अनेक जण ग्रहणाच्या काळात काही नियम पाळतात. ग्र्हण सुटलं की सारं घर साफ करणं, पुन्हा आंघोळ करणं हे पाळतात. परंतू त्याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. ग्रहण ही सामान्य आणि नैसर्गिक खगोलीय घटना आहे.