Surya Grahan 2020 Mumbai Live Streaming: मुंबई मध्ये सूर्य ग्रहणाला सुरूवात; इथे पहा लाईव्ह अवकाशातील नजारा!
Surya Grahan 2020 Mumbai | Photo Credits: Twitter/ANI

Solar Eclipse 2020 Live From  Mumbai:  भारतामध्ये उत्तरेकडील राज्यांमध्ये नागरिकांना काही ठिकाणी कंकणाकृती सूर्यग्रहण पहायला मिळणार आहे. मात्र महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सह राज्यभर आज खंडग्रास सूर्यग्रहण असेल. या अदभूत खगोलीय घटनेबाबत उत्सुकता असणार्‍या अनेकांनी आज ग्रहण पाहण्यासाठी विविध मार्ग आजमावले आहे. दरम्यान मुंबईमध्ये वरळी परिसरात असणार्‍या नेहरू सायन्स सेंटरमध्येही ग्रहण पाहण्याची खास सोय करण्यात आली आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईमध्येही ग्रहणाला सुरूवात झाली आहे. सुमारे 3 तास 28 मिनिटं चालणार्‍या या ग्रहणाचा नजारा मुंबईकर आज घराबसल्या लाईव्ह पाहू शकणार आहेत. NSC Mumbai च्या फेसबूक पेजवरून त्याचं खास लाईव्ह स्ट्रिमिंग दाखवले जात आहे.

सूर्यग्रहण थेट उघड्या डोळ्यांनी पाहणं हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे त्यामुळे रेटिनाचं नुकसान होऊ शकते. त्यामुळे नागरिकांना आज सुरक्षित पर्यायांचा वापर करून सूर्यग्रहण पाहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोना संकटामुळे अनावश्यक गर्दी टाळत घरच्या घरी तुम्हांला सूर्यग्रहण पहायचं असेल तर नेहरू सायंस सेंटरच्या फेसबूक लाईव्ह वरून हा नजारा पाहू शकता. Safety Tips to Watch Surya Grahan: 21 जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल? जाणून घ्या काही खास टिप्स.

सूर्यग्रहणाचं नेहरू सायंस सेंटरच्या फेसबूक पेजवरून लाईव्ह

आज महाराष्ट्रात ग्रहण स्पर्श वेळ - 10: 01,ग्रहण मध्य वेळ- 11: 38 तर ग्रहण मोक्ष वेळ - 13: 28 असेल. हे ग्रहण एकून तीन तास 27 मिनिटं चालू राहणार आहे. सूर्य ग्रहण अमावस्येच्या दिवशी दिसते, जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि तिघेही एका सरळ रेषेत असतात. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याला झाकतो, मात्र लहान आकारामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही, तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. अशा वेळी चंद्र सूर्याच्या मध्यभागी दिसतो आणि सूर्याच्या बाह्याकाराचे कंकण दिसू लागते. पण आज महाराष्ट्रात खंडग्रास कृती ग्रहण दिसेल.