Fact Check: सॅनिटायझरमुळे कॅन्सर होतो? COVID-19 Pandemic मध्ये व्हायरल होणाऱ्या या मेसेज मागील सत्य काय?
Fake news on hand sanitiser | (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात सॅनिटायझरचे (Sanitizer) महत्त्व वाढल्यानंतर त्यासंबंधित अनेक फेक न्यूज (Fake News) सोशल मीडियावर जोर धरु लागल्या आहेत. सध्या सॅनिटायझर संबंधित नवा दावा ट्विटर (Twitter) आणि व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) व्हायरल होत आहे. सॅनिटायझरच्या वापरामुळे कॅन्सर (Cancer) होतो असे या व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये म्हटले आहे. व्हायरल होणाऱ्या या मेसेजमुळे अफवा पसरत आहे. दरम्यान ही माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे.

या मेसेज मार्फत पेपरमधील कात्रण व्हायरल केले जात आहे. त्यावर आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन फोटो दिसत आहे. यामुळे या खोट्या माहितीला अनेकजण बळी पडले आहेत. परंतु, अशा प्रकारची कोणतीही माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही. तसंच ऑल इंडिया रेडिओ आणि केंद्र, राज्य सरकारचे अधिकृत मीडिया प्लॅटफॉर्म्सने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती खोटी असल्याचे सांगितले आहे. (Fact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो? गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित? जाणून घ्या)

व्हायरल होणारी फेक न्यूज:

सॅनिटायझरबद्दलचा हा दावा खोटा असल्याचे सिद्ध करण्यासाठी सरकारने AIIMS चे डिरेक्टर डॉ. रनदीप गुलेरिया यांचे मत सर्वांसमोर मांडले आहे. हँड सॅनिटायझर बनवण्यासाठी 70% अल्कोहोलचा वापर केला जातो. याचा कॅन्सरशी काहीही संबंध नाही. तसंच पाणी उपलब्ध असताना हँड सॅनिटायझरने हात धुणे टाळावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

AIR Tweet:

तसंच जेवणापूर्वी किंवा काहीही खाण्यापूर्वी हँड सॅनिटायझरचा वापर करणे टाळा. या सल्ला गांभीर्याने घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. इतर कोणत्याही परिस्थितीत हात स्वच्छ करण्यासाठी हँड सॅनिटायझरचा वापर करा किंवा हात साबण-पाण्याने धुवा. कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दोन्हीही प्रक्रीया तितक्याच प्रभावी आहेत.