Fact Check: 1 सप्टेंबर पासून विजेचे बिल माफ करण्यासाठी केंद्र सरकार आणणार स्पेशल योजना? PIB ने केला खुलासा
PIB Fact Check (Photo Credits-Twitter)

संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. याच दरम्यान सोशल मीडिया खासकरुन फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्वीटरवर कोविड19 आणि लॉकडाऊन संबंधित काही खोट्या बातम्या आणि माहिती वेगाने व्हायरल होत आहे. अशाच पद्धतीचा एक प्रकार समोर आला आहे. एका व्हायरल व्हिडिओत असा दावा करण्यात आला आहे की, केंद्र सरकार संपूर्ण देशातील नागरिकांचे विजेचे बील माफ करण्यासाठी योजना सुरु करणार आहे. या अंतर्गत विजेचे बिल माफ केले जाणार आहे.

पीआयबी यांनी या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओबद्दल Fact Chek कर तो खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. व्हायरल व्हिडिओतील दाव्याचे खंडन करत असे म्हटले आहे की, केंद्र सरकार विज बिल माफ करण्याबद्दल अशी कोणतीच योजना आणणार नाही आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा खोट्या योजनांपासून दूर रहावे असे आवाहन सुद्धा केले आहे.(PIB Fact Check: कोरोनाबाधित रुग्णांची यादी जाहीर केल्यास 3 महिन्यांसाठी तुरुंगवास होणार? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मॅसेजचा पीआयबीकडून मोठा खुलासा)

[Poll ID="null" title="undefined"]

PIB Fact Check यांनी एक ट्विट करत असे म्हटले आहे की, एक युट्युब व्हिडिओत विज बिल माफ करण्यात येणार असल्याची योजना केंद्र सरकार आणणार आहे. त्यामुळे येत्या 1 सप्टेंबर पासून संपूर्ण देशभरात विजेचे बिल माफ केले जाणार आहे. परंतु हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.(Fact Check: लोअर परळ च्या Phoenix Mall जवळील मुंंबई मेट्रो लाईन कोसळली? पहा या व्हायरल फोटोमागील सत्य)

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या काळात सोशल मीडियात खोटी माहिती वेगाने पसरत आहे. अशातच तुम्ही कोणतीही ऑनलाईन माहिती किंवा वृत्तासंदर्भात त्याची सतत्या जाणून घेतल्याशिवाय दुसऱ्यांना फॉरवर्ड करु नका.