सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात बातम्या व्हायरल (Viral News) व्हायला वेळ लागत नाही. लोक जवळजवळ प्रत्येक बातमी आणि व्हिडिओ त्यामागील सत्य समजून न घेता शेअर करू लागले आहेत. अशाप्रकारे व्हॉट्सअॅपवर खोट्या बातम्यांचा पूर आला आहे. सध्या तुम्ही असाच एक मेसेज पाहिला असेल ज्यामध्ये दावा केला जात आहे की, ज्या लोकांना कोविडची लस (Covid-19 Vaccine) मिळाली आहे त्यांना पंतप्रधानांच्या कल्याण विभागाकडून ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर 5,000 रुपये दिले जात आहेत. आजकाल हा मेसेज व्हायरल होऊ लागला आहे.
या व्हायरल मेसेजमध्ये एक लिंकही शेअर करण्यात आली आहे. यावर जाऊन लोकांना आपली माहिती द्यावी व त्यानंतर त्यांना 5 हजार मिळतील, असे यामध्ये नमूद केले आहे. त्यासाठी 30 जुलै 2022 ची मुदत देण्यात आली आहे.
एक वायरल मैसेज में दावा किया जा रहा है कि जिन लोगों ने कोविड वैक्सीन लगवा ली है उन्हें एक ऑनलाइन फॉर्म भरने के बाद प्रधानमंत्री जन कल्याण विभाग द्वारा ₹5,000 प्रदान किए जा रहे हैं #PIBFactcheck:
▶️ इस मैसेज का दावा फर्जी है
▶️ कृपया इस फर्जी मैसेज को फॉरवर्ड न करें pic.twitter.com/AV8asQzexu
— PIB Fact Check (@PIBFactCheck) July 12, 2022
आता पीआयबी फॅक्ट चेकने या मेसेजची तपासणी केली असता हा मेसेज पूर्णपणे बनावट असल्याचे आढळून आले. हा मेसेज पुढे फॉरवर्ड करू नका, असे आवाहन त्यांनी सर्वसामान्यांना केले आहे. अशा खोट्या दाव्यांमधून लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करण्याचे काम केले जात आहे. तर असा मेसेज तुमच्याकडे किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला आला असेल तर तो फेक समजून डिलीट करा आणि कोणाशीही शेअर करू नका. (हेही वाचा: Fact Check: टोल प्लाझावर 'या' लोकांना भरावा लागणार नाही कोणताही कर, व्हायरल होत आहे मेसेज, जाणून घ्या सत्य)
दरम्यान, अशा प्रकारचे खोटे संदेश पाठवून लोकांकडून नोंदणी करून घेतली जाते व त्याद्वारे त्यांची वैयक्तिक माहिती गोळा केली जाते. या माहितीद्वारे तुमच्यासोबत फसवणूकही होऊ शकते. अशा संदेशांपासून नेहमी सावध राहा, असे पीआयबीचे म्हणणे आहे.