सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल (Viral Messages) होत असतात. बरेच वेळा लोक हा मेसेज खरा आहे की खोटा ते न तपासता तो फॉरवर्ड करत राहतात. यामध्ये अनेक अफवा असतात किंवा चुकीचे दावे केलेले असतात, ज्याचा सत्याशी काहीही संबंध नसतो. असाच एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये देशातील सर्व टोल प्लाझावर पत्रकारांना टोल टॅक्समध्ये सूट मिळेल असा दावा केला जात आहे.
यामध्ये व्हॉट्सअॅप मेसेजसोबतच वर्तमानपत्रातील कटिंगही शेअर केली जात आहे. या कटिंगमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा फोटोही आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, नितीन गडकरी यांनी भारतातील सर्व टोलनाक्यांना सूचना दिल्या आहेत की, सर्व पत्रकारांना कोणताही कर भरावा लागणार नाही. अशा लोकांना फक्त आपले ओळखपत्र दाखवावे लागेल. तसेच सर्व पत्रकारांनी त्यांचे माईक आयडी आणि आयकार्ड सोबत ठेवणे आवश्यक असल्याचेही या संदेशामध्ये लिहिले आहे.
एक #WhatsApp मैसेज में दावा किया जा रहा है कि भारत के सभी टोल प्लाजा पर पत्रकारों को टोल टैक्स पर मिलेगी छूट, जिसके लिए आईडी कार्ड दिखाना होगा आवश्यक#PIBFactCheck:
▶️यह दावा #फर्जी है
▶️@MORTHIndia ने ऐसा कोई आदेश नहीं दिया है
▶️अधिक जानकारी के लिए👇 https://t.co/gMqvYZx17q pic.twitter.com/JFC1JjJQHS
— PIB Fact Check (@PIBFactCheck) July 2, 2022
पीआयबीने व्हायरल मेसेजमध्ये केलेल्या दाव्याची सत्यता तपासली. पीआयबीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत म्हटले आहे की, ‘व्हॉट्सअॅप संदेशात दावा केला जात आहे की, पत्रकारांना भारतातील सर्व टोलनाक्यांवर ओळखपत्र दाखवून टोल टॅक्समध्ये सूट मिळणार आहे. परंतु हा दावा पूर्णपणे खोटा आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने असा कोणताही आदेश जारी केलेला नाही.’ (हेही वाचा: भारत सरकार कडून पासपोर्ट वरून 'राष्ट्रीयत्त्व' चा कॉलम हटवल्याचा दावा खोटा; पहा पीआयबी ने केलेला खुलासा)
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) आदेशानुसार, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, सरन्यायाधीश, मुख्यमंत्री, तिन्ही सेवांचे कमांडर, यासह काही लोकांनाच टोल प्लाझावर सूट मिळते. यामध्ये भारत सरकारचे सचिव, कॅबिनेट मंत्री आणि इतरांचा समावेश आहे.