Representative Image

'Kya Rate Legi': उत्तर प्रदेशातील नोएडा येथून एका महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. पीडितेने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर झालेला त्रास सांगितला आहे. पीडितेने लिहिले की, मी नोएडा येथील सेक्टर-18 मध्ये डीएलएफजवळ माझ्या कॅबची वाट पाहत होते. माझ्या समोरून एक बाईक गेली. दुचाकीच्या मागे एक मुलगा बसलेला होता. त्याने मला विचारले, 'तुझा दर काय?' पीडितेने पुढे लिहिले की, ते एवढ्यावरच थांबली नाही. दरम्यान,  काही सेकंदातच सर्व काही घडले. सुदैवाने, मी सुखरूप घरी परतले. महिला पत्रकारासोबत घडलेली ही पहिलीच घटना नाही. खरं तर, महिला पत्रकाराने त्याच भागात घडलेल्या आणखी एका घटनेबद्दल सांगितले, जिथे गेल्या रविवारी, सेक्टर-18 मेट्रोच्या दिशेने चालत असताना, एक व्यक्ती तिच्याजवळ आला आणि "हॅलो" म्हणत तिचे स्वागत केले. तिला सुरुवातीला पत्रकार असल्यामुळे हॅलो केले असेल असे वाटले . त्यानंतर ती म्हणाली की, तो माणूस म्हंटला की, मी तुला चालताना पाहिले, मला तू खूप आवडली. म्हणून मी थांबून बोलण्याचा विचार केला, 'कुणास ठाऊक, काही संधी मिळेल'. मी नम्रपणे सांगितले की, मला Intrest नाही आणि ही योग्य पद्धत नाही आणि निघून गेले. हे देखील वाचा: Independence Day 2024: देशातील महिलांवरील गुन्ह्यांवर पंतप्रधान मोदींचा कडक संदेश, राक्षसी कृत्य करणाऱ्यांना कडक होणार शिक्षा

नोएडामध्ये महिला पत्रकाराचा विनयभंग

महिला पत्रकाराने लिहिले, त्यानंतर लगेचच मी मेट्रो स्टेशनवर थांबलेल्या माझ्या मित्राला फोन केला आणि मी पोहोचेपर्यंत कॉलवर राहण्यास सांगितले.

महिलेने स्वतःबद्दलचा आणखी एक प्रसंग सांगितला. त्या महिलेने सांगितले की, मी दुसऱ्या दिवशी राजीव चौक मेट्रो स्टेशनवर होते, एक अनोळखी मुलगा आला, त्याने माझा नंबर मागितला, तो म्हणाला की, तू फार सुंदर आहे.

नोएडा पोलिसांनी कारवाईचे दिले आश्वासन 

पीडितेने X वर तक्रार केल्यानंतर नोएडाचे एसीपी प्रवीण सिंह यांचा फोन आला. पीडितेला त्यांच्या वतीने आश्वासन देण्यात आले आहे की, ते प्रत्येक संभाव्य प्रकरणात कारवाई करतील. परंतु पीडितेने X वर लिहिले की, माझा असा विश्वास आहे की, हा मुद्दा कायदा आणि सुव्यवस्थेपेक्षा  वेगळा आहे.  असे असले तरी नोएडा पोलिसांनी हे प्रकरण स्वतःच्या हातात घेतले आहे.