PM Modi Speech | X

Independence Day 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त सलग 11 व्या वेळेस लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. तिरंगा फडकवल्यानंतर पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करताना देशातील महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत कडक संदेश दिला. पंतप्रधानांनी कोलकाता येथील आर. जी. वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि त्यानंतर निर्घृण हत्येबद्दल संताप व्यक्त करत पंतप्रधानांनी कडक संदेश दिला आणि या घटनेबाबत लोकांमध्ये संताप आहे. आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आपल्या माता, बहिणी, मुलींवर होत असलेल्या अत्याचाराबाबत सर्वसामान्यांमध्ये संताप आहे. हे देखील वाचा: Indian Independence Day 2024: भारताचा 78वा स्वातंत्र्यदिन निमित्त PM Narendra Modi यांच्याकडून लाल किल्ल्यावर ध्वजवंदन

 

देश, समाज, आपल्या राज्य सरकारांना याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. महिलांवरील गुन्ह्यांची लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे. राक्षसी कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे, समाजात आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे.

देशातील महिलांवरील गुन्ह्यांवर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला.

पीएम मोदी म्हणाले की, राज्य सरकारांना अशा बाबी गांभीर्याने घ्याव्या लागतील. जेणेकरून देशात अशा घटनांना आळा बसेल. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात असे गुन्हे करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचेही सांगितले.