सोशल मीडीयात अनेक मेसेजेस फिरत असतात. त्यामध्ये अनेकदा फेक न्यूज, खोटे दावेच वेगवान वायरल होत असतात. अशांमध्ये आता व्हॉट्सअॅपवर वायरल होत असलेल्या दाव्यामध्ये भारत सरकार कडून भारतीय पासपोर्टवरचा राष्ट्रीयत्वाचा कॉलम हटवल्याची माहिती वायरल केली जात आहे. पण मूळात हा दावा खोटा असल्याचं पीआयबीने जाहीर केले आहे. सोबतच पीआयबी ट्वीट कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हा दावा खोटा आहे. भारत सरकारने असा कोणताही बदल पासपोर्टवर केलेला नाही.
दरम्यान पासपोर्ट हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. परदेशी प्रवासामध्ये पासपोर्ट ही महत्त्वाची डॉक्युमेंट मानली जाते. तसेच भारतातही ओळखपत्राचा पुरावा म्हणून पासपोर्ट ग्राह्य कागदपत्रांपैकी एक आहे त्यामुळे पासापोर्ट काळजीपूर्वक ठेवणं आवश्यक आहे. Budget 2022 मध्ये भारतीयांसाठी E-Passport ची घोषणा; जाणून घ्या नेमका कसा असतो ई पासपोर्ट, वैशिष्ट्य काय?
पीआयबी ट्वीट
एक #WhatsApp मैसेज में यह दावा किया जा रहा है कि भारत सरकार ने भारतीय पासपोर्ट से राष्ट्रीयता का कॉलम हटा दिया है। #PIBFactCheck
▶️यह दावा #फर्जी है।
▶️भारत सरकार द्वारा पासपोर्ट से सम्बंधित ऐसा कोई आदेश जारी नहीं किया गया है। pic.twitter.com/swFvssq3WJ
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 28, 2022
मागील काही वर्षांमध्ये सायबर क्राईम मध्येही वाढ झाली आहे. सोशल मीडीयात खोट्या बातम्या वायरल करून, लिंक शेअर करून आर्थिक माहिती घेण्याची, फसवणूक करण्याची प्रकरणं वाढली आहेत. त्यामुळे अशा चूकीच्या गोष्टींना निर्बंध घालण्यासाठी वारंवार पीआयबी द्वारा माहिती जारी केली जाते त्यामुळे अधिकृत सूत्रांकडून माहिती घेतल्याशिवाय कशावरही विश्वास ठेवू नका.