अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी भारतीयांना 2022-23 पासून चीप एम्बेड केलेला e-passport मिळणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान परदेशवारी करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या या पासपोर्टचं नवं रूप म्हणजे ई पासपोर्ट आहे. नागरिकांचा वेळ वाचावा आणि सुरक्षित, सुलभ प्रवास करता यावा यासाठी ई पासपोर्ट फायद्याचा ठरणार आहे.
ई पासपोर्ट देखील पूर्वीच्या पासपोर्ट प्रमाणेच काम करणार आहे. मात्र आता यामध्ये केवळ एक चीप असेल. futuristic technology वापरून हा पासपोर्ट बनवला जाणार आहे. या ई पासपोर्ट मध्ये असलेली मायक्रोचीप प्रवाशाची माहिती रेकॉर्ड करू शकेल. भारतात अजूनहि प्रिंटेड पासपोर्ट मिळत असले तरीही यूएसए, युके, जर्मनी मध्ये ई पासपोर्ट आहेत.
ई पासपोर्ट मध्ये पासवर्ड द्वारा बायोमेट्रिक डाटा भरला जाणार आहे. याद्वारा जगभरात इमिग्रेशन साठी लागणारा वेळ वाचणार आहे. हा ICAO compliant असणार आहे. या पासपोर्टची निर्मिती नाशिकच्या India Security Press मध्ये होणार आहे. (Passport Application: पासपोर्ट कसा काढाल? जाणून घ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धत).
ई पासपोर्ट काय असतो?
ई पासपोर्ट देखील पारंपरिक जुन्या पासपोर्ट प्रमाणेच असणार आहे. मात्र या एम्बेडेड चीप मुळे अधिक सुरक्षित असेल. पूर्वी जी माहिती पासपोर्ट वर प्रिंट केली जायची ती आता इलेक्ट्रॉनिक चीप मध्ये असेल.
ई पासपोर्टची फीचर्स
- पासपोर्टच्या चीप मध्ये पासपोर्ट धारकाची माहिती सेव्ह असेल.
- पासपोर्टच्या मागच्या बाजूला चौकोनी आकारातील चीप मध्ये 64 किलोबाईट स्टोरेज कॅपेसिटी असेल.
- सुरूवातील 30 इंटरनॅशनल ट्रिप्सची त्यामध्ये माहिती साठवू शकू इतकी क्षमता असेल.
- हळूहळू त्यामध्ये पासपोर्ट धारकाचा फोटो, बायोमेट्रिक डाटा द्वारा फिंगरप्रिंट्स देखील समाविष्ट केली असतील.
- जर कोणी या चीपसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्यास तो पासपोर्ट अवैध दाखवला जाईल अशी रिपोर्ट्स ची माहिती आहे.
सध्या ई पासपोर्ट ही संकल्पना जगात 120 देशांमध्ये आहेत. यामध्ये बायोमेट्रिक ई पासपोर्ट सिस्टिम ही अमेरिका, युनायटेड किंग्डम आणि जर्मनी मध्ये आहे.