Passport | (Photo Credits: Pixabay)

परदेशात जाण्याचा विचार करताय? मग पासपोर्ट अत्यंत गरजेचा आहे. काही मोजके देश वगळता इतर देशांमध्ये पासपोर्ट (Passport) शिवाय तुम्ही प्रवेश करु शकत नाही. नवीन पासपोर्ट बनवण्याची प्रक्रीया आता अगदी सोपी आणि सुरळीत झाली आहे. यासाठी तुम्हाला एक ऑफलाईन अॅप्लिकेशन (Offline Application) किंवा अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अॅप्लिकेशन (Online Application) भरावे लागेल. ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही दोन पद्धतींचा वापर करु शकता. ई-फॉर्म डाऊनलोड करुन तो सब्मिट करु शकता किंवा पासपोर्ट सेवा केंद्राच्या अधिकृत वेबसाईट passportindia.gov.in वर जावून ऑनलाईन अर्ज करु शकता. (World's Most Powerful Passport: पुन्हा एकदा Japan चा पासपोर्ट ठरला जगात शक्तिशाली; Pakistan शेवटच्या 5 मध्ये, भारतालाही झटका)

ऑफलाईन पद्धतीने पासपोर्ट कसा काढाल?

# पासपोर्ट सेवा पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळ passportindia.gov.in ला भेट द्या.

# Download e-Form सेक्शनमध्ये जा.

# तुम्हाला हव्या असलेल्या सुविधेचा e-form डाऊनलोड करा.

# डाऊनलोड केलेला e-form तुम्ही ऑफलाईन भरा.

# भरलेला e-form अपलोड करा.

पासपोर्ट ऑनलाईन पद्धतीने कसा काढाल?

# पासपोर्ट सेवा पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळ passportindia.gov.in ला भेट द्या.

# New User Registration वर क्लिक करा.

# लॉग ईन करण्यासाठी तुमचे डिटेल्स भरा.

# लॉग ईन झाल्यानंतर सर्व्हिसेसमधील Apply for Passport वर क्लिक करा.

# त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अॅप्लिकेशन फॉर्म दिसेल.

# फॉर्म ऑनलाईन भरुन सब्मिट करा.

फॉर्म सब्मिट केल्यानंतर Pay and Book Appointment वर क्लिक करा आणि पासपोर्ट सेवा केंद्रावरील भेट देण्यासाठी अपॉयमेंट घ्या. पेमेंट करण्यासाठी तुमचा आवडीचा पर्याय निवडा आणि अॅप्लिकेशन फी ऑनलाईन पद्धतीने भरा. त्यानंतर तुमची अपॉयमेंट कर्न्फम होईल. या अॅप्लिकेशनची प्रिंट आऊट आणि लागणारे इतर कागदपत्रं पासपोर्ट सेवा केंद्राला भेट देताना सोबत बाळगा. त्याचबरोबर पासपोर्ट सेवा केंद्राचा अॅप वापरुनही तुम्ही पासपोर्टसाठी अप्लाय करु शकता.