जगात कुठेही प्रवास करण्यासाठी पासपोर्ट (Passport) ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. काही देशांचे नागरिक हे जगातील खूप साऱ्या देशांमध्ये प्रवास करू शकतात, मात्र काही देशांच्या नागरिकांवर बरेच निर्बंध असतात. आता हेनली पासपोर्ट निर्देशांक (Henley Passport Index 2021) ची यंदाची जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची (World's Most Powerful Passport) रँकिंग समोर आली आहे. या यादीत पुन्हा एकदा जपानला अव्वल स्थान मिळाले आहे. त्याखालोखाल सिंगापूर दुसर्या क्रमांकावर आहे, तर जर्मनी व दक्षिण कोरिया संयुक्तपणे तिसर्या स्थानावर आहेत. सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्टच्या यादीमध्ये चीन आणि संयुक्त अरब अमिराती यांनी मोठी उडी घेतली आहे.
अफगाणिस्तान, सिरिया, इराक आणि पाकिस्तान या देशांचा पासपोर्ट सर्वात खराब ठरला आहे. त्याचबरोबर या ताज्या यादीमध्ये भारतालाही मोठा धक्का बसला असून, देशाचे स्थान 90 वे आहे. हेनले पासपोर्ट निर्देशांकानुसार 2006 पासून जपान अव्वल स्थानावर आहे. जपानचे नागरिक हे तब्बल 193 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. दुसऱ्या स्थानावर सिंगापूर असून, तिथले नागरिक 191 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात.
जगातील सर्वात शक्तीशाली पासपोर्ट असणारे पहिले दहा देश –
- जपान– (193)
- सिंगापूर– (192)
- दक्षिण कोरिया– (191), जर्मनी– (191)
- इटली- (190), फिनलँड- (190), स्पेन- (190), लक्झेंबर्ग (190)
- डेन्मार्क (189), ऑस्ट्रिया (189)
- स्वीडन (188), फ्रान्स (188), पोर्तुगाल (188), नेदरलँड्स (188), आयर्लंड (188)
- स्वित्झर्लंड (187), संयुक्त राष्ट्र (187), युनायटेड किंगडम (187), बेल्जियम (187), न्युझीलँड (187)
- नॉर्वे (186), ग्रीस (186), माल्टा (186), झेक प्रजासत्ताक (186),
- कॅनडा (185), ऑस्ट्रेलिया (185)
- हंगेरी (184)
पहिल्या दहा देशांच्या यादीत युरोपियन देशांची संख्या जास्त आहे. ताज्या यादीमध्ये 2020 च्या तुलनेत भारत सहा स्थानांवर घसरला असून तो 90 व्या स्थानावर आहे आणि 58 देशांमध्ये भारतीय नागरिकांना व्हिसाशिवाय प्रवेशाची परवानगी आहे. (हेही वाचा: Tokyo Olympics 2020: टोकियोमध्ये COVID-19 आणीबाणीची घोषणा, ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी जपान सरकारचे मोठे पाऊल)
या यादीच्या पाकिस्तानचे स्थान शेवटून चौथे आहे. पाकिस्तान 113 व्या क्रमांकावर आहे आणि केवळ 32 देशांमध्ये त्यांना व्हिसाशिवाय प्रवेशाची परवानगी आहे. शेवटच्या पाचमध्ये येमेन (112), पाकिस्तान (113), सीरिया (114), इराक (115), अफगाणिस्तान (116) यांचा समावेश आहे.