सौदीमध्ये कावळ्यांचा हल्ला (Photo Credits: Video Grab)

कोरोना व्हायरसच्या बातम्यांसह, दर मिनिटाला भारतातील लोक टोळधाडी, नावाच्या किड्यांवर वर बारीक लक्ष ठेवून आहेत ज्यामुळे काही राज्यांच्या शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. या टोळ झुंडीचे व्हिडिओ पहायला अगदी धडकी भरवणारे आहे. आता एका सुपरमार्केटच्या बाहेर जमा झालेल्या मोठ्या संख्येने कावळ्यांचा (Crows) व्हिडिओ ऑनलाइन शेअर केला गेला आहे. सौदीमध्ये (Saudi Arabia) 'कावळ्यांचा हल्ला' केल्याचे या व्हिडिओमध्ये म्हटले जात आहे. व्हिडीओ 'जगाचा अंत' असलेले कॅप्शन देऊन शेअर केला आहे ज्यामुळे भीती पसरली आहे, परंतु तो सौदीचा नाही. ही घटना 2018 टेक्सासमधील (Texas) वॉलमार्टच्या पार्किंग लॉटमध्ये घडलेली. आणि आता हा व्हिडिओ सौदी अरेबियाच्या सुपरमार्केटमधील (Saudi Arabia Supermarket) म्हणत लोकांद्वारे पुन्हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. (Watch Video: एका तरुणाने चक्क किंग कोब्राला घातली अंघोळ; व्हिडिओ पाहून नेटकरी झाले हैराण)

या व्हिडिओमध्ये असंख्य हजारों कावळे एकत्र जमले आहेत, काही लोकांच्या गाड्यांवर बसलेले आहे आणि आजूबाजूच्या लोकांच्या उपस्थितीमुळे प्रभावित न होता काही मोठ्याने ओरडत आहेत. हा व्हिडिओ काही भयानक चित्रपटातील असल्यासारखा दिसत आहे. लॉकडाउनमध्ये आपणास अनेक प्राण्यांना शहरी वस्तीत घुसल्याच पाहायला मिळालं आणि सौदी अरेबियातील असल्याचा व्हिडिओ पूर्णपणे खोटा आहे. ट्विटरवरील एका यूजरने व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, "कावळे ग्राहकांना सौदीतील सुपर मार्केटमधून बाहेर येऊ देत नाहीत... ही जगाच्या अंतची सुरुवात आहे का??"

सुपरमार्केटवर हल्ला करणार्‍या कावळ्यांचा व्हिडिओ पहा:

वर्षांपूर्वीचा वास्तविक व्हिडिओ येथे पाहा:

तुम्ही देखील यूट्यूबवर वॉलमार्टवर कावळ्यावरील हल्ल्याची साधी तपासणी केल्यास, टेक्सास, ह्यूस्टन कडून असे बरेच वर्षांपूर्वी अपलोड केलेले व्हिडिओ तिथे आहेत. लोकांमध्ये भीती पसरविण्यासाठी प्राणी-पक्षी शहरी भागात असल्याचे असे बरेच खोटे व्हिडिओ किंवा फोटो ऑनलाइन शेअर केले गेले आहेत. हे सर्व खरे की खोटे शोधणे कठीण आहे, पण आम्ही आमच्या वाचकांना कोणत्याही व्हिडिओ, फोटो किंवा वृत्तांवर विश्वास ठेवण्यापूवी त्याची सत्यता पडताळून पाहण्याची विनंती करतो.