सध्या सुर्य चांगलाच तापत असून उन्हाच्या झळांपासून केवळ मनुष्यच नव्हेतर, प्राणीही हैराण झाले आहेत. याच दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडओ व्हायरल होत आहे, ज्यात एक तरूण चक्क किंग कोब्रालाच (Cobra) अंघोळ घालत असल्याचे दिसत आहे. विषारी नाग दिसला तरी, भल्याभल्यांची भंबेरी उडते. मात्र, या व्हिडिओत एक व्यक्ती विषारी नागावर थंड पाणी टाकत आहे. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरच्या माध्यामातून हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच सर्वांनाच सावधानीचा इशाराही दिला आहे. गरमीचे दिवस आहेत. इतक्या उकाड्यात आंघोळ करणे कोणाला आवडणार नाही. मात्र, तुम्ही असे काही करण्याचा प्रयत्न करू नका, हे धोकादायक ठरू शकते, असे नंदा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहे. या व्हिडिओत एक तरुण उन्हाने हैरान झालेल्या कोब्रावर पाणी टाकत आहे. दरम्यान, त्याने अनेकदा कोब्राला स्पर्शदेखील केला आहे. परंतु, कोब्राने हल्ला केला नाही. तो गुपचूप एका जागेवर बसलेला दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, सोशल मीडिया युजर्स हे देखील विचारत आहेत की, हा व्यक्ती कोण आहे? जो चक्क कोब्राला अंघोळ घालत आहे. एवढेच नव्हेतर, अनेकांनी त्याचे कौतूकही केले आहे. तर, काहींनी त्याला सर्पमित्र म्हणून संबोधित केले आहे. हे देखील वाचा-Demi Rose Topless Photo: हॉट अमेरिकन मॉडल डेमी रोज ने आपल्या कुत्र्यासह शेअर केला टॉपलेस फोटो, जरा जपूनच पाहा
ट्विट-
Summer time..
And who doesn’t like a nice head bath🙏
Can be dangerous. Please don’t try. pic.twitter.com/ACJpJCPCUq
— Susanta Nanda IFS (@susantananda3) May 24, 2020
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तसेच या व्हिडिओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. तसेच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. गेल्या काही दिवसापूर्वी असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात वनविभागाचे एक अधिकारी क्रोब्रा सापाला आपल्या हाताने पाणी पाजत असल्याचे पाहायला मिळाले होते.