PIB Fact Check reveals truth behind fake Ujjawala Gas Agency website (Photo Credits: Twitter/PIB Fact Check)

नागरिकांची फसवणूक करणारे अनेक खोटे करणारे मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दिशाभूल करणाऱ्या या मेसेजद्वारे पैशांची फसवणूकही होत असते. असाच एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या मेसेजमध्ये 'उज्ज्वला गॅस एजन्सी' वेबसाईट (Ujjawala Gas Agency Website) पीएसयू तेल मार्केटिंग कंपन्यांतर्फे (PSU Oil Marketing Companies) LPG Distributorship देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, या पोस्टमध्ये देण्यात आलेली वेबसाईट www.ujjwalagasagency.org अशी आहे. पीआयबीने (PIB) यामागील सत्य तपासले असून ही साईट फेक असल्याचे स्पष्ट केले आहे.

पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "मेसेजमध्ये देण्यात आलेली वेबसाईट फेक आहे. खरी माहिती मिळवण्यासाठी http://lpgvitarakchayan.in आणि http://petrolpumpdealerchayan.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या." (Fact Check: MSME मंत्रालय लोन देण्यासाठी 1000 रुपये प्रोसेसिंग फी आकारात आहे? PIB ने उलघडले सत्य)

Fact Check By PIB:

सध्या LPG वितरण करणारे चार फॉरमॅट्स आहेत. ते पुढीलप्रमाणे- शेहेरी वितरक, रुर्बन विट्रॅक, ग्रामीण विट्रॅक आणि दुर्गम क्षेत्रिय विट्रक. यासंदर्भातील ब्रोशर तुम्ही www.lpgvitarakchayan.in या वेबसाईटवरुन डाऊनलोड करु शकता. तर या संदर्भातील मार्गदर्शक सूचना तुम्हाला www.iocl.com, www.ebharatgas.com, www.bharatpetroleum.in, www.hindustanpetroleum.com या वेबसाईटवर मिळतील.

पात्रता निकष भरल्यानंतर तुम्ही www.lpgvitarakchayan.in वेबसाईटवर रजिस्टर करु शकता. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही तुमच्या अकाऊंटमध्ये लॉगईन करु शकता. इतर माहिती भरुन तुम्ही अर्ज सब्मिट करु शकता. यासोबत तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी स्नॅन करुन अपलोड करायची आहे. तसंच अर्जाची फी इंटरनेट बँकींग, डेबिड कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही भरु शकता. परंतु, ही फी परत केली जात नाही.