कोरोना व्हायरस लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) दरम्यान सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि बनावट बातम्यांचा (Fake News) पूर आला आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरून अनागोंदी माजली आहे. अशाच एका ताज्या घटनेत सोशल मीडियावर एक बनावट व्हिडिओ प्रसारित केला जात आहे. यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, एक गर्दीने खचाखच भरलेली श्रमिक स्पेशल ट्रेन (Shramik Special Train) मुंबईमधून पश्चिम बंगालमध्ये प्रवासी कामगार घेऊन जात आहे. या फोटो अनेकांनी शेअर केला होता. मात्र आता या दाव्याचे खंडन करीत सरकारने सोशल मीडिया वापरकर्त्यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ खोटा असल्याचे सांगितले आहे.
पीआयबीकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार, श्रमिक स्पेशल ट्रेन म्हणून पसरवण्यात आलेला हा व्हिडिओ बांगलादेशातील ट्रेनचा जुना व्हिडिओ आहे. 1 मेपासून भारतीय रेल्वे श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु केली. मात्र आता या व्हिडिओमुळे अशा रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या कामगारांमध्ये भीती पसरली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर, प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोने हा बनावट व्हिडिओ उघडकीस आणला आहे. आपल्या ट्वीटमध्ये पीआयबीने म्हटले आहे, हा व्हिडिओ बांगलादेशमधील 2018 सालच्या ट्रेनचा आहे.
Claim - video of an overcrowded train is circulating on social media with a message claiming it is Shramik Special train carrying migrants from Mumbai to West Bengal#PIBFactCheck- It's an old video of an overcrowded train in Bangladesh from the year 2018. The video is #Fake. pic.twitter.com/LEKlFUkFjf
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 17, 2020
दरम्यान, या श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी प्रवाशांची योग्य तपासणी केली जात आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांना मोफत जेवण व पाणी दिले जात आहे. आतापर्यंत, भारतीय रेल्वेने 15 दिवसांत अडकलेल्या 14 लाखांहून अधिक लोकांना आपल्या घरी पोहचवले आहे. 15 मे मध्यरात्रीपर्यंत एकूण 1074 'श्रमिक स्पेशल' गाड्या, देशभरातील विविध राज्यांमधून धावल्या आहेत. आता भारतीय रेल्वे कोणत्याही जिल्ह्यातून 'श्रमिक स्पेशल' ट्रेन चालविण्यासाठी सज्ज असल्याचे, पियुष गोयल यांनी सांगितले आहे.