नरेंद्र मोदी यांच्या 'या' सवयी मुळे झाला विजय, शिल्पा शेट्टी हिने केलं हटके अभिनंदन
Shilpa Shetty Wishes Narendra Modi (Photo Credits: Instagram)

लोकसभा निवडणुकीचा निकाल (Loksabha Election  Result) काल नरेंद्र मोदी (Narendra Modi)  व भाजपाच्या बाजूने लागला आणि सोशल मीडियावर अभिनंदनाचं सत्र सुरु झालं. देशविदेशातील अनेक मोठ्या आसामींनी, राजकीय नेत्यांनी, कलाकारांनी मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव केला. या मध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांचा देखील समावेश आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar), सलमान खान (Salman Khan), अर्जुन कपूर (Arjun Kapoor)  या सेलिब्रिटींनी मोदींचा विजय हा लोकशाहीचा मोठा सोहळा आहे अशा आशयाचे ट्विट करून अभिनंदन केले. पण या मध्ये अभिनेत्री व फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)  हिने मोदींच्या विजयाचे कौतुक करत त्यांच्या एका सवयीमुळे हा विजय शक्य झाल्याचे म्हंटले आहे. शिल्पाने आपल्या ट्विटमध्ये मोदींचा योगा करतानाचा फोटो शेअर करत, "देखा, योगा से ही होगा" असे म्हंटले आहे.

शिल्पा शेट्टी ही नेहमीच योगा व व्यायामाचे व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असते यावरून तिच्या फिटनेस फ्रिक असण्याचा अंदाज येतच असतो.त्यासोबत इतरांना देखील व्यायामाचे सल्ले शिल्पा देत असते. नरेंद्र मोदी हे देखील काही त्याला अपवाद नाहीत, या आधी अनेकदा मोदींचे योगा कर्तनाचाई फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. त्यामुळे याच सवयीने मोदींना या भूमी भंजन निवडणूक लढवायला मदत झाली आणि या विजयासाठी मी त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम करते अशा आशयाचे ट्विट केले आहे. नरेंद्र मोदी यांनी देखील या ट्विटवर शिल्पा शेट्टीचे आभार मानले आहेत.

शिल्पा शेट्टी ट्विट

चहाचे वाटप करत विवेक ओबेरॉय याने साजरा केला भाजप पक्षाच्या विजयाचा आनंद (Viral Pics)

 सेलिब्रिटींनी नरेंद्र मोदींना अशा दिल्या शुभेच्छा 

दरम्यान नरेंद्र मोदी यांनी या कलाकारांचे व देशातील जनतेच्या प्रती आभार प्रकट केले होते, आज मोदी हे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत अडवाणींची भेट घेणार आहेत तर रविवारी म्हणजे 30 मे ला पंतप्रधान पदासाठी शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.