चहाचे वाटप करत विवेक ओबेरॉय याने साजरा केला भाजप पक्षाच्या विजयाचा आनंद  (Viral Pics)
Vivek Oberoi (Photo Credits: Yogen Shah)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाच्या लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) मधील दणदणीत विजयानंतर मोदी समर्थकांमध्ये आणि शुभचिंतकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याच दरम्यान आज नरेंद्र मोदींचा बायोपिक 'पीएम नरेंद्र मोदी' हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमात अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) मोदींची भूमिका साकारत आहे.

फिल्म स्क्रिनिंग दरम्यान विवेक ओबेरॉय याने चहा देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. त्याच्यासोबत दिग्दर्शक ओमंग कुमार आणि निर्माता संदीप सिंह देखील होते. याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

@vivekoberoi with #wife priyanka today at the Screening of movie #pmmodi . #bollywoodstars #actors #paparazzi #yogenshah @yogenshah_s

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

 

View this post on Instagram

 

#vivekoberoi celebrates the victory of #narendramodi by serving tea near his home @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संघर्षमय काळात चहा देखील विकला आहे. तसंच अनेकदा त्यांना चहावाला म्हणूनही ट्रोल करण्यात आले. अशावेळी निवडणूकीतील विजय आणि पीएम नरेंद्र मोदी सिनेमाचे प्रदर्शन याचा आनंद साजरा करण्यासाठी विवेक ओबेरॉय याने चहाचा पर्याय निवडला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोत विवेक ओबेरॉय अतिशय खूश दिसत आहे.

पीएम नरेंद्र मोदी या सिनेमात मोदींचा राजकीय, धार्मिक आणि सामाजिक जीवनातील संघर्षांचे दर्शन घडते.