शिवसैनिक, लेखक  दि. बा. पाटील यांच्या 'भली माणसं' पुस्तकातील व्यक्तिरेखा शिवाजी विद्यापीठ अभ्यासक्रमात समाविष्ट
साहित्यिक दि. बा. पाटील | (संग्रहित छायाचित्र)

शिवसैनिकाच्या पुस्तकातील व्यक्तिरेखा शिवाजी विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यात आली आहे. वयाच्या 65 वर्षांनंतर एका शिवसैनिकाला लेखक होण्याचा मान मिळाला आहे. दि. बा. पाटील (D B Patil) असे या शिवसैनिकाचे नाव आहे. दि. बा. पाटील यांच्या 'भली माणसं' पुस्तकातील 'बाबा मास्तर' ही व्यक्तिरेखा शिवाजी विद्यापीठ (Shivaji University Kolhapur) कला शाखा पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षातील ( बी. ए. भाग तीन) अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. अर्थात दि. बा. पाटील हे शिवसैनिक (Shivsainik) जरुर आहेत. पण ते हाडाचे लेखकही आहेत. राजकारणात आणि त्यातही शिवसेना (Shiv Sena) पक्षासारख्या संघटनेत असूनही त्यांनी लेखन, आणि वाचनाचा व्यासंग जपला आहे. 11 कादंबऱ्या, 3 कथासंग्रह आणि 1 व्यक्तिचित्र संग्रह अशी त्यांची साहित्य संपदा आहे.

दि. बा. पाटील हे मुळचे सांगली जिह्यातील कामेरी गावचे रहिवासी आहेत. त्यांनी आतापर्यंत शिवसेना पक्षात शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख अशा विविध पदांवर काम केले आहे. मात्र, राजकारणासारख्या लोकसंपर्काच्या आणि सतत व्यग्र असण्याच्या क्षेत्रात असूनही पाटील यांनी आपले लेखण आणि वाचन सुरु ठेवले. सातत्याने ते लिहीत आले आहेत. परंतू, मुख्य प्रवाहातील साहित्य वर्तुळाने त्याची फारसी दखल कधीच घेतली नाही. मात्र, आता वयाच्या 65 नंतर का होईना साहित्यीक म्हणून त्यांची दखल घेतली गेली. शिवाजी विद्यापीठ अभ्यासक्रमात दि.बा. पाटील यांच्या लिखाणाचा समावेश करुन त्यांच्या लिखाणाला एकप्रकारे पोचपावतीच दिली आहे. (हेही वाचा, Shiv Sena 54th Foundation Day: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना वाटचाल, स्वप्नपूर्ती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजकारण यांबाबत 5 ठळक मुद्दे)

खरं तर दि. बा. पाटील हे तसे पहिलवान. पण पहिलवानकी करता करता त्यांनी वाचनाचीही आवड जोपासली. वाचनातून त्यांचा व्यासंग वाढत गेला. त्यातून त्यांना सूचत गेले. पुढे ते बोलू लागले. कथा सांगू लागले आणि अखेर त्यांनी लेखणी हाती घेतली. पाहता पाहता त्यांनी 11 कादंबऱ्या, 3 कथासंग्रह आणि 1 व्यक्तिचित्र संग्रह लिहिला. याच काळात केव्हातरी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या प्रभावाखाली आले. त्यांनी शिवसैनिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, चित्रपट अभिनेते विलास रकटे यांच्याशी दि.बा. पाटील यांचा जुना स्नेह. या स्नेहातून त्यांनी 'प्रतिकार' नावाच्या सिनेमात कामही केले. त्यांच्या लिखाणात प्रामुख्याने सांगली आणि वाळवा तालुक्यातील भाषेचा बाज दिसतो. मुख्य प्रवाहातील साहित्य वर्तुळाने त्यांच्या लिखाणाची दखल घेतली नसली तरी साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावरुन ते सातत्याने भूमिका मांडत राहिले. त्यांनी विधानसभा निवडणूक 2009 लढवली होती. शिराळा विधानसभा मतदारसंघातील ते शिवसेना उमेदवार होते. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.