Shiv Sena Founder Balasaheb Thackeray | (Photo Credit: ShivSena.org)

शिवसेना स्थापना दिन: महाराष्ट्राचा राजकीय असो की सामाजिक-सांस्कृतिक इतिहास लिहायचं म्हटलं तर ज्या पक्षाचा उल्लेख टाळता येणे अशक्य आहे, असा शिवसेना (Shiv Sena) पक्ष आज आपला 54 वा वर्धापन दिन (Shiv Sena 54th Foundation Day) साजरा करत आहे. गेल्या पाच दशकांचा इतिहास पाहता वर्धापनदिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक (Shiv Sainik) शिवसेनेची जन्मभूमी असलेल्या मुंबई शहरात दाखल होतात. मात्र कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना यंदा आपला वर्धापन दिन अत्यंत साधेपणाने साजरा करत आहे. शिवसेना पक्षप्रुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाल्याने यंदाचा वर्धापन दिन जल्लोशात साजरा करण्याचा मनोदय शिवसैनिक व्यक्त करत होते. गेले प्रदीर्घ काळ महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेच्या वाटचालीतील हे 5 महत्त्वाचे मुद्दे.

प्रबोधनकारांचे मार्गदर्शन बाळासाहेब ठाकरे यांचा निर्णय

व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकातून मराठी मानसांच्या भावनेला हात घातला. जनभावना जागी झाली. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी बाळासाहेबांना ही जनभावना संघटनेत परावर्तीत करण्याची दिशा दाखवली. 19 जून 1966 या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना ही संघटना स्थापन केली. या संघटनेला प्रबोधनकार ठाकरे यांचे मार्गदर्शन होते.

Uddhav Thackeray. (File Photo: IANS)

शिवसेना-भाजप युती

शिवसेनेच्या स्थापनेपासूनच शिवसेना आक्रमक संघटना राहिली आहे. शिवसेनेची वाटचाल एकला चलो रे अशीच होती. मात्र, 1989 मध्ये शिवसेनेच्या प्रवासाला एक वेगळे वळण मिळाले. 1998 मध्ये शिवसेना-भाजप युती झाली. अर्थात त्यापूर्वीही शिवसेनेने अनेक पक्षांशी युती केली होती. नाही असे नाही. यात काँग्रेस, समाजवादी पक्षासह अगदी कट्टर विरोधक असलेल्या दलित पँथर सोबतही. पण ही युती काहीशी वेगळी आणि निर्णायकी होती. जी पुढे जवळपास 25 वर्षे टिकली. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही युती झाली. (हेही वाचा, भाजप फारच नंतर आला, शिवसेना नेतृत्वाने या आधीही अनेक पक्षांशी केली आहे युती, हा पाहा इतिहास)

Shiv Sena | (Photo Credit: ShivSena.org)

सत्तासोपान

युतीचा फायदा शिवसेना-भाजप अशा दोन्ही पक्षांना झाला. 1995 मध्ये शिवसेना भाजप युती सरकार महाराष्ट्रात सत्तेत आले. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. पुढे हेच मनोहर जोशी 1999 मध्ये सत्तेत आलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित एनडीए सरकारमध्ये लोकसभा अध्यक्ष होते. महाराष्ट्रात तळागाळात वाढण्यासाठी, हातपाय पसरण्याठी या दोन्ही पक्षांना फायदा झाला.

शिवसेना-भाजप युती तुटली

जवळपास 25 वर्षे गुण्यागोविंदाने चाललेला शिवसेना-भाजप संसार विधानसभा निवडणूक 2014 मध्ये संपला. जागावाटपाच्या मुद्द्यावरुन दोन्ही पक्षात मतभेद निर्माण झाले. भारतीय जनता पक्षाने युती तुटल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक 2014 मध्ये हे दोन्ही पक्ष युतीद्वारे एकत्र लढले होते. त्यावेळी शिवसेनेचे 18 खासदार निवडूण आले. मात्र, पुढे काही महिन्यांमध्येच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शिडात स्वबळाचे वारे संचारले आणि युती तुटली.  (हेरी वाचा, शरद पवार यांचा 'पॉवर गेम'; महाराष्ट्रात अनेकांच्या दांड्या गुल, भलेभले चितपट, पंतप्रधान मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रमक राजकारणाला लगाम)

Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

स्वप्न झाले साकार- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री

मुंबई येथील शिवाजी पार्क (शिवसेनेच्या भाषेत शिवतिर्थ) मैदानात मी.. उद्धव... बाळासाहेब... ठाकरे.. शपत घेतो की...! असा आवाज घुमला आणि असंख्य शिवसैनिकांच्या अपेक्षांची पुर्ती झाली. अनेकांचे आणि शिवसेनेचेही स्वप्न साकार झाले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस अशा तिन पक्षांच्या महाविकासआघाडी सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून करत आहेत. (हेही वाचा, Maharashtra Assembly Election 2019: कमळ, हाताचा पंजा आणि घड्याळ, जाणून घ्या विविध राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांचा इतिहास)

Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credit: ShivSena.org)

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे हा प्रवास सोपा नव्हताच मुळी. 2014 मध्ये शिवसेना भाजप युती तुटली. त्यानंतर लोकसभा निवडणूक 2019 आणि विधानसभा निवडणूक 2020 मध्ये या दोन्ही पक्षांची युती झाली. केंद्रात शिवसेनेला एक मंत्रिपदही मिळाले. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पद आणि सत्तावाटप या मुद्द्यावर पुन्हा एकदा शिवसेना-भाजप यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष कसे एकत्र आले आणि महाविकासआघाडी सरकार स्थापन करुन सत्तासोपानही चढले हे इतिहास ताजा आहे. या इतिहासाला भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांना रातोरात सोबत घेऊन पहाटे-पहाटे राजभवनावर जाऊन घेतलेल्या शपथविधीचीही झालर आहे.